‼️ दिवसभरातील टॉप महत्वाच्या घडामोडी Top Updates 🌧️ संपूर्ण देशात 9% पेक्षा जास्त झाला पाऊस मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील 25 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. . हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा 9% जास्त पाऊस झाला आहे. 😳 जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला - अपडेट्स महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Stay informed about our mission start reading our blog today. I am sharing all updates on this blog. Like a News, Articles, Study Material, Latest updates, Images, Jokes, history and rules of sport etc.