Skip to main content

Posts

Showing posts with the label Govt. Update

आधार कार्ड-धारकांसाठी UIDAI कडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Govt. Update

😱  आधार कार्ड-धारकांसाठी UIDAI कडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Govt. Update 🪪  अनेकजण आधार कार्डची झेरॉक्स कचऱ्यात टाकून देतात, त्यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग होतो .  ✨  तर काही लोक या कागदपत्रावरून बनावट आधार कार्ड बनवून घेतात, हा सगळा प्रकार थांबवण्यांसाठी UIDAI ने एक परिपत्रक जारी केले आहे.  💁‍♀️  पहा काय सांगितले UIDAI ने  😇 आधार कार्डचा  12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी केली जाईल, तसेच एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कोणत्याही  स्वरूपाचे  आहे  - जसे की E आधार, आधार PVC कार्ड आणि M आधार ते तपासले जाऊ शकते   💫 तसेच mAadhaar अँपचा वापर करून कोणत्याही आधार कार्डची सत्यता तपासता येते, दरम्यान आधार पडताळणी केल्यावर बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला कलम 35 अंतर्गत दंड केला जाईल, असेही UIDAI ने सांगितले आहे.   🙏  प्रत्येक नागरिकांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरना देखील शेअर करा

मोठी बातमी ! - 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीची प्रक्रिया होणार सुरु Govt. Update

👮‍♂️  मोठी बातमी ! - 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीची प्रक्रिया होणार सुरु   Govt. Update 🧐 राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे ⏲️ त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालकांकडून पोलीस आयुक्तांसह पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. 💁‍♀️  जाणून घ्या सविस्तर  🖊️ यामध्ये संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. तर रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे.  💫 सर्वाधिक जागा मुंबई, पुणे शहर आणि ग्रामीण, मीरा भाईंदर, लोहमार्ग मुंबई याठिकाणी आहेत. मुंबईत ६ हजार ७४० तर मिरा भाईंदरमध्ये ९८६ जागा तर पुणे शहरमध्ये ७२० पदे, पुणे ग्रामीणमध्ये ५७९ आणि लोहमार्ग मुंबईत ६२० पदे रिक्त आहेत. 🖥️ दरम्यान, 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW....

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी - शेतीचे पंचनामे आता सॅटेलाईट बेस होणार Govt. Update

🧐  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी - शेतीचे पंचनामे आता सॅटेलाईट बेस होणार  Govt. Update 🌧️ राज्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा राज्य सरकारकडे लागलेल्या असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. 🤷‍♀️  काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?  🗣️ उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की “शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. शेतीत नुकसान झाल्यास पंचनामे करावे लागणार नाहीत.  🛰️ म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल. त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत केली जाईल. लवकरच अशी सिस्टीम उभारली जाणार आहे.  👉  दरम्यान राज्यात ओला  - दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. परतीचा पाऊस नेहमीच होतो. शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेत आहोत.  💵 तसे सगळे पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा कळेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत करु. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सा...

मोठी बातमी ! - एसटीच्या तिकिट दरात मोठी वाढ Govt. Update

😱  मोठी बातमी ! - एसटीच्या तिकिट दरात मोठी वाढ   Govt. Update 📝 एसटी महामंडळाकडून दिवाळीत महसूल वाढीसाठी दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जाते. शिवसेना नेते दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना, त्यांनी दिवाळीच्या काळात एसटीची अशी हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता 🤷‍♀️  किती रुपयांनी झाली वाढ ?  ▪️ एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळीत 10 दिवसांसाठी तिकिट दरात 5 ते 75 रुपयांची हंगामी वाढ केली आहे. ही भाडेवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, ती 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.  ▪️ तर 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांना नेहमीप्रमाणेच एसटीचे तिकीट दर असतील, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे. ▪️ तसेच एसटीची ही हंगामी दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व एसी बसेसला लागू राहील.  ▪️ मात्र, शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’, तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना ही दरवाढ लागू नसेल. 🙂  एसटीच्या तिकिट दरात वाढ झाली - हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा

😱 सरकारी कर्मचाऱ्यांना झटका - कामाचे दिवस वाढणार ? Govt. Update

 😱 सरकारी कर्मचाऱ्यांना झटका - कामाचे दिवस वाढणार ? Govt. Update ⏲️ तुम्हाला  माहिती असेल, सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता व खर्चसुधार धोरणानुसार पाच दिवसांचा आठवडा सुरू केला होता. पण, आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता आहे. ✍️ सोमवार ते शुक्रवार असे ठरवलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवण्यात येणार आहेत.  💁‍♀️ जाणून घ्या काय आहे कारण 📝 सरकारी कर्मचारी सोमवार ते शुक्रवारपर्यंत कामे करीत असून, शनिवार व रविवार सुटी मिळत आहे. मात्र, शनिवारी सुट्टी असल्याने अनेक कर्मचारी शुक्रवारपासूनच कार्यालयातून गायब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. 👥 त्यामुळे सरकारी कामकाजावर परिणाम होत असल्याने शिंदे सरकार 5 दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा विचार करीत आहे. लवकरच तसा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. 📍 दरम्यान या निर्णयाविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇 प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  - हि बातमी नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - विजमध्ये होणार दरवाढ. Govt. Update

😱  राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - विजमध्ये होणार दरवाढ Govt. Update 🧐 राज्यातील जनतेला पुन्हा वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपनी महावितरणला वीज दरवाढ प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले.  🤷‍♂️  किती रुपयांनी होणार वाढ ?  💫 सध्या हे शुल्क प्रति युनिट १.३० रुपये आहे. दरम्यान पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांनी वाढणार आहे. त्यामुळे इंधन शुल्काचा दर 2 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ⚡ दरम्यान याविषयी सविस्तर अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  ✒️  वीज मध्ये दरवाढ होणार  - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! - राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर Govt. Update

👌  एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! - राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर Govt. Update 💰 एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या ताेंडावर राज्य सरकारनं एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 📝 मात्र एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा पगारासाठी 360 कोटी रुपये निधीची गरज असते, पण सरकारनं 300 कोटींचीच मदत जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  🗣️ मागणीनुसार निधी द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे. 💁‍♂️  जाणून घ्या सविस्तर  💸 एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात. मात्र, गेल्या 3 महिन्यांत राज्य सरकारने फक्त 600 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर झाले नाहीत. 🚌 आम्ही जेवढ्या निधीची मागणी केली होती, तेवढा निधी दिवाळीआधी द्यावा, अन्यथा राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा बरगे यांनी दिला आहे. 📌 आपण थोडस सहकार्य करा - हि माहिती इतरांन...

चेकने व्यवहार करण्यासाठी होणार नवे नियम लागू - पहा कसे आहेत नियम Govt. Update

💰  चेकने व्यवहार करण्यासाठी होणार नवे नियम लागू  - पहा कसे आहेत नियम  Govt. Update 📝 गेल्या काही दिवसांत चेक बाऊन्स होण्याची प्रकरणे वाढली आहेत - चेक बाऊन्सची प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्यासाठी वित्त मंत्रालयाने नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.  ✨ त्यात अनेक महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यामध्ये चेक बाऊन्स प्रकरणांबाबत नियम अधिक कडक केले जाणार असल्याचे - अधिकाऱ्यांनी म्हटले आहे  💁‍♂️  कोणते नियम होणार लागू ?  ▪️ धनादेश जारी करणाऱ्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास त्या व्यक्तीच्या इतर बॅंक खात्यातून रक्कम कापून घेतली जाऊ शकते. ▪️ चेक बाऊन्सचे प्रकरणं कर्ज डिफॉल्ट म्हणून हाताळलं जाईल, त्याची क्रेडिट माहिती कंपन्यांना कळवली जाईल. जेणेकरून त्या व्यक्तीचे गुण कमी करता येतील, ज्याच्या त्याच्या सिव्हील स्कोअरवर परिणाम होईल. ▪️ चेक बाऊन्सची केस कोर्टात दाखल केली जाऊ शकते. हा दंडनीय गुन्हा असून, चेकच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ▪️ चेक बाऊन्स झाल्यास काही दिवसांसाठी संबंधित व्यक्तीला बँक...

अनुकंपा तत्वावरील प्रचलित धोरणात बदल - आता बेपत्ता कर्मचाऱ्याच्या वारसास मिळणार नोकरी Govt. Update

🧐 अनुकंपा तत्वावरील प्रचलित धोरणात बदल - आता बेपत्ता कर्मचाऱ्याच्या वारसास मिळणार नोकरी  Govt. Update ✒️ तुम्हाला माहिती असेल, शासकीय नोकरीत कार्यरत असताना जर कुठल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास अनुकंपा तत्वानुसार शासकीय नोकरी दिली जात होती  👉 आता या नियमात बदल केला जाणार असून - जर शासकीय नोकरीत कार्यरत कर्मचारी बेपत्ता झाला असेल तरी देखील त्याच्या वारसास अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी दिली जाईल.  🗣️ यामध्ये अनुकंपा नियमानुसार बेपत्ता कर्मचाऱ्याच्या मृत्यूची सक्षम न्यायालकडून मृत म्हणून खात्री पटणे बंधनकारक राहणार आहे - असे सरकारने म्हटले आहे

रेशन कार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - सरकारकडून विशेष दिवाळी 'पॅकेज' जाहीर Govt. Update

👌  रेशन कार्ड-धारकांसाठी आनंदाची बातमी - सरकारकडून विशेष दिवाळी 'पॅकेज' जाहीर  Govt. Update 🧐 राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी 'गिफ्ट' देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे - यामध्ये चार वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे.  🤷‍♂️ कोणत्या वस्तू मिळणार ?  📦 प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.  ✒️ हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येणार आहे. त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल - तसेच या शिधावस्तूंचा वाटप दिवाळी पूर्वी होणार - असेही राज्य सरकारने म्हटले आहे  😇  प्रत्येक रेशन कार्डधारकांसाठी  - हि बातमी खूप आनंदाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! -आता 'अशा' वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही Govt. Update

😱  केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! -आता 'अशा' वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही  Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने हवेचे प्रदूषण करणाऱ्या गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी ‘स्क्रॅप पाॅलिसी’ आणली होती.  ✒️ त्यानंतर आता केंद्र सरकारने गाडीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वाहनचालकाकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास पेट्रोल - डिझेल दिले जाणार नाही 💁‍♂️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?  📝 पेट्रोलपंपावर इंधन भरताना आता ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे, अन्यथा वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. येत्या 25 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू केला जाणार आहे 🗞️ तसेच, वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे आढळल्यास वाहनचालकांना ते पंपावरच दिले जाणार आहे. देशातील सर्व पेट्रोलपंपांवर ही व्यवस्था केली जाणार आहे 💰  मोटार वाहन कायद्यानुसार   - ज्या वाहन-धारकाकांकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसेल अशा वाहनचालकांना 10 हजार रुपयांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो -  असे...

👌 आता ३१ डिसेंबर पर्यंत मिळणार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ - रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर Govt. Update

👌 आता ३१ डिसेंबर पर्यंत मिळणार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ - रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर Govt. Update 💫 तुम्हाला माहिती असेल, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला यायाधी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती - मात्र आता मोदी सरकारने या योजनेला पुन्हा एकदा 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.  ⏲️ त्यामुळे गोरगरीब जनतेला आता डिसेंबर-2022 पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार आहे - असे काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले 📍  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा - लाभ आता डिसेंबर-2022 पर्यंत मिळणार, हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा

🧐 रेशन कार्ड-धारकांसाठी महत्वाचा निर्णय - मोफत अन्न योजनेत होणार मोठा बदल Govt. Update

🧐  रेशन कार्ड-धारकांसाठी महत्वाचा निर्णय - मोफत अन्न योजनेत होणार मोठा बदल  Govt. Update 🙂 तुम्हाला माहिती असेल, कोरोना काळात केंद्र सरकारने ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजना’ सुरु केली होती. मात्र सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याने मध्यंतरी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा झाली होती.  🖊️ पण आतापर्यंत सातत्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. सध्या फ्री रेशन योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. या योजनेला आणखी 3 ते 6 महिने मुदतवाढ दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे  🗣️ दरम्यान हि योजना सुरु असताना या योजनेत मोठा बदल करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे  💁‍♂️  पहा काय बदल होणार ?  📙 आगामी काळात मोफत अन्न-धान्याऐवजी लाभार्थींच्या खात्यावर थेट ‘डीबीटी’ च्या माध्यमातून पैसे जमा करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. अर्थात, ‘रेशन की पैसे’ याची निवड करण्याची मुभा लाभार्थांना असणार आहे. 👩‍💻 सध्या या प्रस्तावावर चर्चा सुरू असून, पुढील आर्थिक वर्षात हे बदल होऊ शकतात - दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या...

🔖 ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या गाईडलाईन्स जारी - प्रत्येकाने वाचा

🔖 ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या गाईडलाईन्स जारी - प्रत्येकाने वाचा  Govt. Update 🧐 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त ‘ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स’ आणि ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ बाबत नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत 🤷‍♂️ कशा आहेत गाईडलाईन्स ? ✍️ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ‘मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स’ची मान्यता आता केवळ 5 वर्षांसाठी असणार आहे.  🗣️ त्यानंतर ट्रेनिंग सेंटरला आपली मान्यता पुन्हा एकदा ‘रिन्यू’ करावी लागणार - असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे  👉 २. गाईडलाईन्स - आता कोणत्याही नागरिकाच्या नावे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ जारी करण्यापूर्वी प्रशिक्षणार्थीला ‘ड्रायव्हिंग टेस्ट’मध्ये उत्तीर्ण व्हावंच लागणार आहे.  🚗 तसेच ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना लोकांना सहज सेवा मिळावी, यासाठी ‘ट्रेनिंग सेंटर्स’शी संबंधित सेवा शुल्काची माहिती द्यावी लागेल - असेही स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 🙏 दरम्म्यान ड्रायव्हिंग लायसन्स बाबत - जारी केलेले हे नवे न...

गाडीतील ‘सीट बेल्ट’ बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा Govt. Update

🧐  गाडीतील ‘सीट बेल्ट’ बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा  Govt. Update ✍️ कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या नागरिकांनाही आता ‘सीट बेल्ट’चा वापर बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.  📙 या नवीन नियमावर 5 ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची मतं मागवली जाणार आहेत. तसेच नागरिकांच्या सूचनांनुसार, नवे नियम लागू केले जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे 🤷‍♂️  पहा कसे आहेत नियम ▪️ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, वाहन निर्मात्या कंपन्यांना वाहनांच्या मागच्या ‘सीट बेल्ट’साठी ही ‘अलार्म’ लावण्यास सांगितलं आहे. मंत्रालयाकडून त्यासाठीचे ‘ड्राफ्ट नोटिफिकेशन’ जारी करण्यात आलं आहे. ▪️ M व N  श्रेणीतील (किमान चार चाके असणारी) वाहनांमध्ये ‘सीट बेल्ट अलार्म’ अनिवार्य असेल. ओव्हर स्पीडसाठी अलार्म बंधनकारक असेल. तसेच सेंट्रल लॉकसाठी मॅन्युअल ओव्हर राइड.असेल  ▪️ M1 श्रेणीच्या वाहनांमध्ये ‘चाइल्ड लॉक’ला परवानगी दिली जाणार नाही. ▪️ समोरच्या सर्व आसनांसाठी बेल्ट अनिवार्य असेल. ▪️ अलार्म तीन स्तरांवर वाजतील. ▪️ कारचे इंजिन सुरु झाल्यावर व...

डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - १ ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम Govt. Update

😱  डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - १ ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम    Govt. Update 🧐 क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या व्यवहार करण्याच्या नियमात १ ऑक्टोबर पासून महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत - तसा हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू केला जाणार होता.   ✒️ पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा नियम लागू करण्याची मुदत पुढे ढकलून 30 जून 2022 केली होती. मात्र आता आरबीआयने आपली शेवटची मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली आहे  💁‍♂️  पहा कसे आहेत नियम ? ▪️ आरबीआय आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन’ नावाचा एक नियम आणणार आहे. ▪️ त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार करण्यासाठी 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी टाकावा लागतो.  ▪️ तसेच सर्व माहिती अचूक भरल्यानंतरच व्यवहार यशस्वी होतो. मात्र यामध्ये टोकनायझेशन नसल्याने फसवणूक जास्त प्रमाणात होत होती  ▪️ मात्र आता जेव्हा तुमच्याकडून तुमच्या डेबिट/क्रेडिट का...

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम Govt. Update

😱 अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम  Govt. Update 📝 असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे.  ⏲️ त्यानुसार जी व्यक्ती आयकर भरत असेल अश्या व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 नंतर या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे. 🤷‍♂️  कशी आहे अधिसूचना  ? ▪️ तुम्हाला माहिती असेल , अटल पेन्शन योजना आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. ▪️ वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.  ▪️ तसेच अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे ...

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! - पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार घट. Govt. Update

📣 सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! - पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार घट Govt. Update 🧐 केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील अप्रत्याशित कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.  💁‍♂️  पहा सविस्तर  ✒️ तुम्हाला माहिती असेल, काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 97.40 डाॅलरवर गेली होती. मात्र, या महिन्यात ही किंमत प्रति बॅरल 92.67 डाॅलरवर आली आहे 💰 दरम्यान आता केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील कर 13,300 रुपये प्रति टनावरून 10,500 रुपये केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, डिझेलवरील निर्यात शुल्क 13.5 रुपयांवरुन 10 रुपये प्रति लिटर केले आहे.   ✈️ याचबरोबर विमानातील इंधनावरील निर्यात शुल्क 9 रुपयांवरुन 5 रुपये प्रति लिटर केले आहे - तर नवीन दर आजपासून लागू होतील - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे  📌 दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती विषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇  पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार...

🔖 विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी - आता पाचवीपासून शिकवले जाणार शेती विषयक धडे Govt. Update

  🔖 विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी - आता पाचवीपासून शिकवले जाणार शेती विषयक धडे  Govt. Update 🧐 अत्याधुनिक शेतीकडे तरुणांचा कल वाढावा, तसेच भविष्यात नोकरी नाहीच मिळाली, तरी शेती व्यवसाय करण्यासाठी भावी पिढी निपुण व्हावी -  🗣️ यासाठी राज्य सरकारने आता शालेय विद्यार्थ्यांना पाचवीपासून ‘शेती’ विषयाचे धडे देण्याचे नियोजन केले आहे - असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले  🤷‍♂️ पहा काय म्हणाले कृषिमंत्री ? ▪️ अब्दुल सत्तार म्हणाले, की महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना लवकरच पाचवीपासून शेती (Agriculture) हा विषय शिकवला जाणार आहे. पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाईल.  ▪️ शालेय विद्यार्थ्यांना शेतीबाबत धडे शिकवण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावाेगाव असलेल्या सरकारी जागा दिल्या जातील. तसेच यासाठी शिक्षकांनाही याबाबत काही दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सत्तार यांनी दिली 🐄 यामध्ये - पिकांवर औषध फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी-म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर कसा कर...

💁‍♂️ शेकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - जनावरांना मोफत मिळणार लंपीची लस Govt. Update

💁‍♂️  शेकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - जनावरांना मोफत मिळणार लंपीची लस  Govt. Update 🧐 राज्यात लंपी व्हायरस खूप वेगाने पसरत आहे. आतापर्यंत राज्यात 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार नियंत्रणार आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना जनावरांचे लसीकरण जलद करण्याचे आदेश दिले आहेत.  🗣️ तसेच ही लस जनावरांना पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. - असेही पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे   🤷‍♂️  आणखी काय सांगितले पशुसंवर्धन विभागाने ? ▪️ पशुपालन आणि डेअरी विकास विभागाचे राज्य आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी म्हटले आहे की, लंपी त्वचा रोगाच्या नियंत्रणासाठी जनावरांना मोफत लंपीची लस मिळणार असल्याचे सांगितले,  ▪️ आम्ही लसीकरणासाठी 50 लाख कुपी तयार करत आहोत, तसेच पुढील आठवड्यापासून लस सर्वत्र उपलब्ध होईल. 👉  पशुसंवर्धन विभागाने - प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आतापर्यंत 1,755 गावांमध्ये 5 लाख 51 हजार 120 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लंपीची लागण झालेल्या 2,664 जनावरांपैकी 1,520 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.  😇  जनावरांना मोफत ल...