😱 केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! -आता 'अशा' वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने हवेचे प्रदूषण करणाऱ्या गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी ‘स्क्रॅप पाॅलिसी’ आणली होती.
✒️ त्यानंतर आता केंद्र सरकारने गाडीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वाहनचालकाकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास पेट्रोल - डिझेल दिले जाणार नाही
💁♂️ पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?
📝 पेट्रोलपंपावर इंधन भरताना आता ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे, अन्यथा वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. येत्या 25 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू केला जाणार आहे
🗞️ तसेच, वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे आढळल्यास वाहनचालकांना ते पंपावरच दिले जाणार आहे. देशातील सर्व पेट्रोलपंपांवर ही व्यवस्था केली जाणार आहे
💰 मोटार वाहन कायद्यानुसार - ज्या वाहन-धारकाकांकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसेल अशा वाहनचालकांना 10 हजार रुपयांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे
📌 आता ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास - पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, हि माहिती आपण इतर वाहनधारकांना शेअर करा
Comments