⌚ वर्षभरात तयार होते रोलेक्स, कार क्रॅशसारखी चाचणी, लोक गुंतवणुकीसाठीही खरेदी करतात Brand Success Story
⌚ वर्षभरात तयार होते रोलेक्स, कार क्रॅशसारखी चाचणी, लोक गुंतवणुकीसाठीही खरेदी करतात Brand Success Story ✅ रोलेक्स - लक्झरी घड्याळ उत्पादक ✅ स्थापना - १९०५ ✅ विक्री - ४७ हजार कोटी (२०१९) 👉 रोलेक्स हा घड्याळाचा ब्रँड आहे, परंतु गेल्या शतकात तो जगभरात लक्झरी व समृद्धीचा समानार्थी झाला आहे. ११७ वर्षांपूर्वी कंपनी सुरू झाल्यावर काही वर्षांत हवामान व परिस्थिती काहीही असो, रोलेक्सने अचूक वेळ सांगावी, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. ✅ समुद्रात (३९,३७० फूट) त्याची चाचणीही घेण्यात आली आणि १९५३ मध्ये एडमंड हिलरी व तेनझिंग नोर्गे हेही रोलेक्स परिधान करून माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर गेले. बर्फापासून वाऱ्यापर्यंत, रेस ट्रॅकपासून वाळवंटापर्यंत रोलेक्स घड्याळांची चाचणी घेण्यात आली. ✅ बाजारात येण्यापूर्वी प्रत्येक घड्याळाची प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यात कार क्रॅशसारख्या २० चाचण्या आहेत, त्यानंतर एक घड्याळ तयार होण्यासाठी एक वर्ष लागते. कंपनी दरवर्षी दहा लाख घड्याळे बनवते. रोलेक्स चर्चेत आहे, कारण त्याच्या काही मॉडेल्सना इतकी मागणी आहे की किंमत दुप्पट झाली आहे. 😯 १४२ कोटींचे सर्वात...