⌚ वर्षभरात तयार होते रोलेक्स, कार क्रॅशसारखी चाचणी, लोक गुंतवणुकीसाठीही खरेदी करतात Brand Success Story
⌚ वर्षभरात तयार होते रोलेक्स, कार क्रॅशसारखी चाचणी, लोक गुंतवणुकीसाठीही खरेदी करतात
Brand Success Story
✅ रोलेक्स - लक्झरी घड्याळ उत्पादक
✅ स्थापना - १९०५
✅ विक्री - ४७ हजार कोटी (२०१९)
👉 रोलेक्स हा घड्याळाचा ब्रँड आहे, परंतु गेल्या शतकात तो जगभरात लक्झरी व समृद्धीचा समानार्थी झाला आहे. ११७ वर्षांपूर्वी कंपनी सुरू झाल्यावर काही वर्षांत हवामान व परिस्थिती काहीही असो, रोलेक्सने अचूक वेळ सांगावी, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
✅ समुद्रात (३९,३७० फूट) त्याची चाचणीही घेण्यात आली आणि १९५३ मध्ये एडमंड हिलरी व तेनझिंग नोर्गे हेही रोलेक्स परिधान करून माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर गेले. बर्फापासून वाऱ्यापर्यंत, रेस ट्रॅकपासून वाळवंटापर्यंत रोलेक्स घड्याळांची चाचणी घेण्यात आली.
✅ बाजारात येण्यापूर्वी प्रत्येक घड्याळाची प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यात कार क्रॅशसारख्या २० चाचण्या आहेत, त्यानंतर एक घड्याळ तयार होण्यासाठी एक वर्ष लागते. कंपनी दरवर्षी दहा लाख घड्याळे बनवते. रोलेक्स चर्चेत आहे, कारण त्याच्या काही मॉडेल्सना इतकी मागणी आहे की किंमत दुप्पट झाली आहे.
😯 १४२ कोटींचे सर्वात महाग रोलेक्स हॉलीवूड अभिनेते पॉल न्यूमनच्या रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना घड्याळाचा (ग्रीन डायल) न्यूयॉर्कमधील फिलिपाइन्स सेंटरमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये १७.८ दशलक्ष डाॅलरमध्ये लिलाव करण्यात आला.
💸 आजमितीस हे मूल्य १४२ कोटी रुपये आहे. हे १९६८ मॉडेलचे घड्याळ पॉलच्या पत्नीने त्यांना भेट म्हणून दिले होते, तिच्या पाठीवर ‘मला काळजीपूर्वक चालवा’ असे कोरले होते. पॉल न्यूमन अभिनेते, रेस कार ड्रायव्हर व व्यापारीही होते.
• रोलेक्स १४ सेगमेंटमध्ये घड्याळे बनवते
• सर्वात स्वस्त रोलेक्स घड्याळाची किंमत ४.५लाख रु.
• एका वर्षात दहा लाख घड्याळे तयार होतात
• २९% स्विस घड्याळ बाजारातील वाटा
• २०२५ पर्यंत २.३ लाख कोटी रुपयांची विक्री होईल
🤔 $रोलेक्स घड्याळे सर्वात महाग का? रोलेक्स घड्याळांमध्ये सर्वात महागड्या स्टीलसोबतच सोने, प्लॅटिनम यांचाही वापर करण्यात येतो. इतर घड्याळांत सामान्. ३१६ एल स्टीलचा वापर होतो, तर रोलेक्समध्ये टॉप-क्लास ९४० एल स्टील आहे.
🤍 त्याच्या डायलमध्ये पांढरे सोने असते. अंकदेखील विशेष काचेच्या प्लॅटिनमपासून बनवलेले असतात. रोलेक्स स्वतःच्या कारखान्यात घड्याळांमध्ये वापरण्यासाठी सोन्याची (१८ कॅरेट) प्रक्रिया करते. असे करणारी ही एकमेव घड्याळ कंपनी आहे. विशेष बाब म्हणजे त्याचे जिनिव्हा हेडक्वार्टर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या बाबतीत तुरुंगापेक्षा कमी नाही.
💸 रोलेक्सवर डॉलरपेक्षा जास्त विश्वास १९७० च्या दशकात अमेरिकन डॉलरवरील विश्वास कमी होत असताना, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकांचा तेलावरील विश्वासही डळमळला तेव्हा काही लोक रोलेक्स घड्याळांकडे एक विश्वासार्ह वस्तू म्हणून पाहू लागले.
👉 काही विक्रेते स्वित्झर्लंडमध्ये रोलेक्स घड्याळे विकत घेत आणि इटलीमध्ये विकत असत. मग इटलीचे लोक लक्झरी घड्याळे घालत आणि अमेरिकेत व जगाच्या इतर कोपऱ्यात जात असत, तिथे ते ही घड्याळे अनेक पट किमतीत विकत असत. अशा प्रकारे घड्याळ संग्राहकांचा बाजार सुरू झाला.
🤫 मागणी : एका वर्षात किमती दुप्पट... काही रोलेक्स मॉडेल्सच्या प्रचंड आंतरराष्ट्रीय मागणीमुळे त्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.
😯 एक वर्षापूर्वीपर्यंत १८ कॅरेट सोन्याचे रोलेक्स कॉस्मोग्राफ (ग्रीन डायल) ५२,००० डाॅलरला विकले जात होते, पण या महिन्यात त्यांची किंमत ९६ हजार डॉलर्स (सुमारे ७६ लाख रुपये) वर पोहोचली आहे. रोलेक्सच्या काही मॉडेलची किंमत ४ लाख रुपयांपासून कोटीपर्यंत जाते. रोलेक्सने २०२१ मध्ये सुमारे १० लाख घड्याळे बनवली. मॉर्गन स्टॅन्लेच्या अंदाजानुसार, २०१९ मध्ये कंपनीने ४७ हजार कोटी रुपयांची विक्री केली.
😊 इतिहास : महायुद्धात कंपनी गेली स्वित्झर्लंडला हॅन्स विल्सडॉर्फ आणि आल्फ्रेड डेव्हिस हे रोलेक्स सुरू करणारे दोघे. मुख्य भूमिका विल्सडॉर्फ यांची होती. ते एका घड्याळ कंपनीत कामाला होते. नंतर त्यांनी १९०५ मध्ये लंडनमध्ये स्वतःची कंपनी स्थापन केली. पहिल्या महायुद्धामुळे विल्सडॉर्फ लंडन सोडून जिनिव्हाला गेले आणि त्यानंतर स्वित्झर्लंडचे जिनिव्हा हे रोलेक्सचे मुख्यालय झाले.
😯 जुन्या चित्रांप्रमाणे वाढत आहेत रोलेक्सच्या किमती! जगभरातील अनेक लोक रोलेक्स गोळा करत आहेत. न्यूयॉर्कमध्ये २०१७ च्या रोलेक्स लिलावापासून घड्याळांच्या लिलावाने स्वतःचे एक वेगळे मार्केट तयार केले आहे. जुन्या चित्रांसारखी गुंतवणूक म्हणून लोक त्यांच्याकडे बघत आहेत. त्यांचे विंटेज मार्केटही खूप मोठे आहे.
💯 ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा
Comments