Skip to main content

Posts

Showing posts with the label Informative Update

UIDAI चा मोठा निर्णय ! - १० वर्षांतून एकदा आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य Informative Update

🎯  UIDAI चा मोठा निर्णय ! - १० वर्षांतून एकदा आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य  Informative Update 🧐 प्रत्येक नागरिकाला देत असलेला आधार क्रमांक कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे गरजेचे आहे - असे केंद्र सरकारने म्हटले आहे  🗣️ आधार क्रमांक अद्ययावत केल्यामुळे आधार तपशिलाची सेंट्रल आयडेन्टिटीज डेटा रिपॉझिटरीमधील अचूकता कायम राखली जाईल - असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने जाहीर केले 💁‍♀️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?  🖊️ आधार धारकाने आधारसाठी नोंदणी केल्यापासून किमान १० वर्षांतून एकदा तरी आधार अद्ययावत करावे असे , UIDAI ने सांगितले आहे.  💫 आधार क्रमांक धारकाने त्याचे ओळखपत्र, वास्तव्याचा तपशील अशी कागदपत्रे १० वर्षांनी एकदा अद्ययावत करणे आवश्यक आहे  🤔    कसे करता येईल आधार अपडेट ?  - आधारकार्ड अपडेट मायआधार या पोर्टलवर जाऊन करता येणार तसेच  मायआधार अॅप वापरूनही माहिती अद्ययावत करता येते.  📍 तसेच आधार नोंदणी केंद्रावर जाऊन देखील माहिती अद्ययावत करता येणार आहे - असे UIDA...

मोठी बातमी ! - फ्लिपकार्टनेवरून COD केल्यास लागणार अतिरिक्त शुल्क Informative Update

😱 मोठी बातमी ! - फ्लिपकार्टनेवरून COD केल्यास लागणार अतिरिक्त शुल्क  Informative Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी फ्लिपकार्टनेवरून कॅश ऑन डिलिव्हरी केल्यास विशेष प्राईज रेंज वस्तू खरेदीवर शिपिंग चार्ज आकारला जात होता.  🗣️ मात्र आता , कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हँडलिंग शुल्क द्यावे लागणार आहे - असे फ्लिपकार्टने म्हटले आहे  🤷‍♀️  किती लागणार शुल्क ?  💰 500 रुपये पेक्षा अधिक खरेदीवर 5 रुपये तर 500 रुपये पेक्षा कमी खरेदीवर ग्राहकाला 40 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 💫 हँडलिंग कॉस्ट वाढल्याने हे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे - असेही फ्लिपकार्टने म्हटले आहे.  🙏 आपण थोडस सहकार्य करा  - हि माहिती इतरांना देखील शेअर करा

जुन्या वाहनांनाही मिळणार BH सिरींजचा नबंर - जाणून घ्या सविस्तर. Informative Update

🎯 जुन्या वाहनांनाही मिळणार BH सिरींजचा नबंर - जाणून घ्या सविस्तर Informative Update 📣 तुम्हाला माहिती असेल सध्या प्रवास करत असताना - दुसऱ्या राज्यातील नंबरप्लेट दिसल्यास वारंवार अडवले जाते.  🚗 मात्र जर तुमच्याकडे बीएच नंबर प्लेट असल्यास अशा प्रकारे अडवले जात नाही - बीएच सिरीज बद्दल आपण याआधी भरपूर माहिती घेतली आहे  🤷‍♂️  या नंबर प्लेटचा जास्त फायदा -  देशातील वेग वेगळ्या राज्यात नोकरी करणार्यां लोकांना होणार आहे - नियमानुसार बीएच नंबर हा केवळ खासगी वाहनांसाठीच मिळणार -  व्यावसायिक वापराच्या वाहनांवर हा नियम लागू होणार नाही.  😇  दरम्यान आता जुन्या वाहनांनाही -   BH सिरींजचा नबंर मिळणार - हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

💳 कार्ड टोकनायझेशन कसे करावे ? जाणून घ्या सविस्तर Informative Update

💳  कार्ड टोकनायझेशन कसे करावे ? जाणून घ्या सविस्तर   Informative Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, डिजिटल पेमेंट सुरक्षित करण्यासाठी RBI ने कार्ड टोकनायझेशन अनिवार्य केले आहे -  📝  आपण ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी केल्यास किंवा आपल्या कार्डसह डिजिटल पेमेंट केल्यास आपल्याला कार्ड टोकनायझेशन घ्यावे लागेल - दरम्यान कार्ड टोकनायझेशन कसे करावे याविषयी आपण सविस्तर या मॅसेज मध्ये पाहू  🤷‍♂️  टोकनायझेशन म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय ? -  टोकनायझेशन म्हणजे आपली क्रेडिट-डिट कार्ड माहिती टोकन (कोड) सह रूपांतरित करणे. आपण बर्‍याचदा पाहिले असेल की ऑनलाईन पेमेंट केल्यावर आपली कार्ड माहिती त्या संबंधित शॉपिंग वेबसाईटवर दिली जाते.  ▪️ पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा आपल्याला फक्त सीव्हीव्ही नंबर आणि कार्डचा ओटीपी प्रविष्ट करावा लागेल. ▪️ मात्र आता कार्ड टोकनायझेशन मुळे ऑनलाईन पेमेंटसाठी कार्ड डेटाऐवजी टोकन वापरली जातील. यामुळे ऑनलाईन फसवणूकीची शक्यता कमी होईल. 🤔  टोकनायझेशन कसे करावे ?   - कॉर्ड टोकनायझेशनसाठी ई-कॉ...

👌 ‘पासपोर्ट’ बनवण्याच्या नियमामध्ये होणार मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Informative Update

👌  ‘पासपोर्ट’ बनवण्याच्या नियमामध्ये होणार मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Informative Update ✒️ तुम्हाला माहिती असेल, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ असल्याशिवाय ‘पासपोर्ट’ दिला जात नाही. पासपोर्ट काढताना ‘पीसीसी’ ही एक महत्वाची प्रक्रिया आहे.  📍 निवासी स्थिती, रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा, इमिग्रेशनसाठी अर्ज करताना ‘पोलिस व्हेरिफिकेशन’ आवश्यक असत - मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे  🤔  पहा काय सांगितले परराष्ट्र मंत्रालयाने ?  ▪️ पासपोर्टसाठी अनिवार्य असलेल्या ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी अर्जदारांना आता ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये अर्ज करता येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे.  ▪️ यासाठी मंत्रालयाने भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना ‘पीसीसी’ साठी अर्ज करण्याच्या सुविधेसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ▪️ त्यामुळे पासपोर्ट अर्जदार आता ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ साठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.  👉  आपण थोडस सहकार...

आता घरबसल्या पाहता येणार हवामान अपडेट - पहा सविस्तर Informative Update

🌍  आता घरबसल्या पाहता येणार हवामान अपडेट - पहा सविस्तर   Informative Update 🧐 देशात बदलत्या हवामानानुसार कुठे पाऊस तर कुठे ऊन अशी परिस्थिती यंदा काही दिवसांपूर्वी दिसली. दोन ते तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवरात्रीत अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण -  ✒️ तर काही ठिकाणी पावसाने जोर धरला आहे - यामुळे जर आपल्याला हवामानाची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर काही मोबाईल ॲप्स आपल्याला मदत करतील चला तर जाणून घेऊ. 🔰  १. Weather - Live & forecast  - हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. या अँप मध्ये तुम्हाला रोजचे तापमान, अंदाजात्मक हवामान बदल माहिती मिळते   🔰  २. Weather & Radar India  - हे अ‍ॅप देखील स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे - यामध्ये हवामान थेट रडार नकाशे, मान्सून पावसाचा अंदाज, फार्म वेदर, 7 ते 14 दिवसांचा लोकल वेदर फोरकास्ट यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. 🔰  ३. Weather Apps - Weather Live  - हे अ‍ॅप तुम्हाला सध्याच्या ताज्या वेळेचा हवामान अंदाज देते. तसेच यामध्ये लोकल व नॅशनल असे दोन पर्याय दिलेले आहेत. इथून प्रत...

😱 1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी - पहा सर्वसामान्यांवर काय परीणाम होणार. Informative Update

😱 1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी - पहा सर्वसामान्यांवर काय परीणाम होणार Informative Update 🧐 दर महिन्याच्या 1 तारखेला आर्थिक क्षेत्राशी निगडीत गोष्टी बदलत असतात. त्यामुळे कधी खिशाचा भार वाढतो, तर कधी कमीही होतो ✒️ त्यामुळे 1 सप्टेंबरपासून विविध गोष्टी बदलणार आहेत तसेच काही नवे नियम देखील लागू होणार आहेत. पाहू या सविस्तर  📝  विमा स्वस्त होणार - विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सामान्य विमा कंपन्यांना एजंटचे कमिशन 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यास सांगितले. याआधी हे कमिशन 30 ते 35 टक्क्यांपर्यंत होते.  ▪️ त्यामुळे आता एजंटचे कमीशन कमी केले जाणार असल्याने भविष्यात विम्याच्या प्रीमियममध्ये कपात होऊ शकते. 💰  गॅस महागणार - पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘एलपीजी’ गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर करतात.  ▪️ ऑगस्टच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. कदाचित सप्टेंबरमध्येही गॅस दरवाढीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. 🚗  पेट्रोल-डिझेल महागणार  - महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. गेल्या काही...

🤔 व्यवसाय नेमका कसा सुरू करावा? चला जाणून घेऊयात स्टेप बाय स्टेप..Business ideas update

  🤔 व्यवसाय नेमका कसा सुरू करावा? चला जाणून घेऊयात स्टेप बाय स्टेप.. ⚠️ नुसत विचार करण्या पेक्षा आणि कोठून सुरुवात करायची याचा अंदाज लावण्यापेक्षा, तुमच्या व्यवसायाचे तुमच्या डोक्यावर असलेल्या लाइट बल्बमधून वास्तविक अस्तित्वात रुपांतर करण्यासाठी या स्टेप्स नक्की फॉलो करा. सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न विचारा 👇 ✅ तुम्हाला व्यवसाय का सुरू करायचा आहे? कोणतीही गोष्ट सुरू करण्याआधी आपल्याला त्या गोष्टीचा "Why" जाणुन घेणे फार गरजेचे आहे, जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर स्वतःला नीट दिले म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी पुर्णपणे स्पष्टता भेटेल. ✅ तुम्ही व्यवसायाचे मालक होण्यासाठी तयार आहात का? विशेषत: सुरुवातीच्या स्टार्टअप टप्प्यात व्यवसाय चालवण्यासाठी बरेच काही केले जाते. त्यात काय समाविष्ट आहे ते शोधा आणि तुम्ही ते करण्यास तयार आहात का ते पहा. जर ते कठीण वाटत असेल तर निराश होऊ नका. शेवटी, इतर लोक पण ते करत आहेत.  ✅ तुमचे Skills & Expertise काय आहेत? अनेक छोटे व्यवसाय मालक विशिष्ट कौशल्य किंवा Expertise ने सुरुवात करतात. ही तुमची केस असल्यास, संपूर्ण बोर्डवर तुमच...

🥤 कोका-कोला : ट्रेड सिक्रेट तिजोरीत, दररोज 2.1 अब्ज बाटल्यांची विक्री, प्रदूषणातही नंबर वन = Brand Success Story

 🥤 कोका-कोला : ट्रेड सिक्रेट तिजोरीत, दररोज 2.1 अब्ज बाटल्यांची विक्री, प्रदूषणातही नंबर वन = Brand Success Story • कोका-कोला = बेव्हरेज कंपनी • स्थापना = १८९२ • बाजारमूल्य = २२ लाख कोटी 🥇 जगातील नंबर वन शीतपेय कंपनी कोका-कोला गेल्या १३६ वर्षांपासून एकाच सूत्रावर काम करत आहे. या शतकात आहाराच्या सवयी बदलल्या, आरोग्याबाबत जागरूकता आली, पण कोका-कोलाच्या पेयांच्या बाजारपेठेवर काहीही परिणाम झाला नाही. 🚫 साखरेच्या अतिवापरामुळे अनेक सेलिब्रिटींनीही यावर जाहीर बहिष्कार टाकला. गेल्या वर्षी रोनाल्डोने पत्रकार परिषदेतून याच्या बाटल्या काढल्या होत्या. तथापि, वादानंतर कंपनी आता ॲडेड शुगर कमी करत आहे आणि झीरो शुगरच्या नावाखाली काही उत्पादनांचा प्रचारदेखील केला जात आहे. 💵 या ७०० अब्ज डाॅलरच्या शीतपेयांच्या बाजारपेठेत कोका-कोलाचे मालक बदलत राहिले तरी ते एका शतकापासून बाजारपेठेवर राज्य करत आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या १९३ पेक्षा अधिक सदस्य देशांमध्ये त्याची विक्री होते. त्यावर फक्त उत्तर कोरिया आणि क्युबामध्ये बंदी आहे. सध्या ५७ वर्षीय जेम्स क्विन्सी २०१७ पासून कोका-कोलाचे सीईओ आहेत. 😯 कोक म्...

💔 राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! Informative Update

💔 राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! 👉 शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झाल्याची माहिती आहे. राकेश झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसांपासूून आजारी असल्याची माहिती आहे. 😢 प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं आहे. बिग बुल अशी त्यांची ओळख होती. 🏥 झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना रुगणालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झालं आहे. 🐂  राकेश झुनझुनवाला यांची बिग बुल अशी ओळख होती. त्यासोबत अक्सा एअर या कंपनीची देखील त्यांनी स्थापना केली होती. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे देखील ते प्रवर्तक होते. त्यांची नेटवर्थ ५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. 🤔 राकेश झुनझुनवाला नेमके कोण? 👉  राकेश झुनझुनवाला यांची उद्योजक, गुंतवणूकदार आणि भारता...

🚀 मर्सिडीझ ब्रँडच्या यशाची कहाणी : जगातील पहिल्या सुपरकारची निर्माती कंपनी, दर मिनिटाला चार कारची विक्री ( Mercedes brand success story )

  🚀 मर्सिडीझ ब्रँडच्या यशाची कहाणी : जगातील पहिल्या सुपरकारची निर्माती कंपनी, दर मिनिटाला चार कारची विक्री 💯 ‘ओह लॉर्ड, वोंट यू बाय मी अ मर्सिडीझ बेंझ?’ हे प्रसिद्ध गीत गायक जेनिस जाॅप्लिन यांनी १९७२ मध्ये रेकॉर्ड केले होते. मात्र, या गाण्यावर भौतिक गोष्टींचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, याही पलीकडे जवळपास शतकभरापासून मर्सिडीझ वाहनांकडे दर्जा, यश आणि कर्तृत्व म्हणून पाहिले जाते. ✅ मर्सिडीझ सलग सहा वर्षांपासून जगातील सर्वात मौल्यवान लक्झरी कार ब्रँडमध्ये पहिल्या दहामध्ये आहे. आणि या यादीतील पहिल्या दहामध्ये ही एकमेव जर्मन कंपनी आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कारची मान्यता मिळवणारी मर्सिडीझ ही जगातील पहिली कंपनी आहे. 👉 मर्सिडीझ ऑटोमोबाइल कंपनी स्थापना : १९२६  👉 बाजारमूल्य : ५.३५ लाख कोटी रु. 👨 ओला केलेनियस मर्सिडीझ-बेंझ ग्रुप एजी व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष स्वीडनचे रहिवासी ओला २०१५ मध्ये पहिल्यांदा मर्सिडीझच्या बोर्डावर आले. सध्या ते २०१९ पासून कंपनीच्या बोर्डाचे अध्यक्ष आहेत. 💰 पगार २५ कोटी रुपये इतिहास : १०० वर्षांपूर्वी दोन कंपन्यांनी केली मर्सिडीझची स्थापना ✅ आपल्...

UIDAI चा मोठा निर्णय ! - आता घरबसल्या बनवता येणार आधार कार्ड

‼️ UIDAI चा मोठा निर्णय ! - आता घरबसल्या बनवता येणार आधार कार्ड Informative Update 🧐 तुम्हाला माहिती असेल , याआधी आधार कार्ड काढण्यासाठी आधार केंद्रांवर जावे लागत होते - मात्र आता आपल्याला घरबसल्या नवीन आधार कार्ड बनवता येणार  ✒️ UIDAI ने आधार FaceRD नावाचे नवीन फिचर लॉंच केले आहे - या फिचरच्या माध्यमातून आपल्याला हे आधारकार्ड काढता येणार आहे 🤔 पहा कसे काढता येईल ? -  ▪️ सर्वप्रथम Google Play Store वरून आधार FaceRD डाउनलोड करा - यानंतर अ‍ॅपवर सांगितलेल्या माहितीद्वारे एक -एक स्टेप पुढे जा - चेहरा ऑथेंटिकेशनसाठी आपला चेहरा प्रकाशात असणे गरजेचे आहे ▪️ तसेच चेहारा नीट दिसणे गरजेचे आहे , या अँपमुळे आधार कार्ड धारकाला यापुढे लोकेटर आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन चेहरा ऑथेंटिकेशन आणि फिंगरप्रिंट स्कॅन करण्याची आवश्यकता नाही 👉 FaceRD अँपच्या मदतीने - फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे अ‍ॅप आधार ऑथेंटिकेशनसाठी एखाद्या व्यक्तीचा चेहरा थेट कॅप्चर करते.  💫 याव्यतिरिक्त रेशन वितरण, कोविन लसीकरण अ‍ॅप, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कल्याण योजना यांसारख्या घटनेत संबंधित...

वीज बिलातील दरवाढ ऑक्टोबर पर्यंत राहील - जाणून घ्या सविस्तर

   वीज बिलातील दरवाढ ऑक्टोबर पर्यंत राहील - जाणून घ्या सविस्तर Informative Update ✍️ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार - यंदा इंधन दरात पुन्हा वाढ झाली आहे.  💰 त्यामुळे पुढील 5 महिने ग्राहकांकडून हा वाढीव खर्च वसूल केल्या जाणार - तर वीज बिलातील ही वाढ जून ते ऑक्टोबर दरम्यान राहील. 💁‍♂️ दरवाढ कितीने होणार ▪️ संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे 3.3 कोटी विद्युत ग्राहक आहेत ▪️ तर या दरवाढीनुसार , घरगुती ग्राहक जर 0-100 युनिट वीज वापर करतील -  त्यांना 65 पैसे प्रति युनिट अधिक पैसे मोजावे लागतील ▪️ तर 101-300 युनिट विद्युत वापर करणा-या ग्राहकाला 1 रुपया 45 पैसे प्रति युनिट जास्त मोजावे लागतील ▪️ 301-500 युनिट विद्युत वापर असणा-या ग्राहकांच्या खिश्यावर प्रत्येक बिलात प्रति युनिट 2.05 रुपयांचा बोजा पडेल ▪️ तर 500 युनिट पेक्षा अधिक विद्युत वापर करणा-या ग्राहकांना प्रति युनिट 1 रुपये 35 पैसे - तर व्यावसायिक ग्राहकांना 2.20 रुपये प्रति युनिट अधिभार पडेल 😇  वीज ग्राहकांसाठी - हि माहिती नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरां...

💁‍♂️ ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट

  💁‍♂️ ATM मध्ये गेल्यावर ATM कार्ड नसतांनाही काढू शकता पैसे ! - जाणून घ्या महत्वाचे अपडेट Informative Update 💰 तुम्हाला माहिती असेल एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो - मात्र आता कार्ड नसतांना सुद्धा पैसे काढता येतात  🏦 NCR कॉर्पोरेशनने हि सुविधा सुरु केली असून - भारतात SBI मध्ये YONO App चा वापर केला जातो आणि दुसरी यूनियन बँक मध्ये UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा देते 📍 UPI द्वारे पैसे कसे काढाल ? ▪️ UPI App द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी - सर्वात आधी अशा ATM मध्ये जा जेथे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा दिली जाते - भारतात 1500 असे एटीएम आहेत जे यासाठी सपोर्ट करतात ▪️ नंतर तुमाच्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही UPI App ओपन करून मशिनमध्ये दिलेल्या QR Code ला स्कॅन करावे-  यानंतर जितके पैसे काढायाचे आहेत ते टाका - ट्रान्झेक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील 📍 YONO App द्वारे पैसे कसे काढाल ? ▪️ YONO App द्वारे पैसे काढण्यासाठी - तुमचे SBI अकाउंट असेल, तर YONO App डाउनलोड करून - आयडी, पासवर्ड किंवा एम पिनचा वापर करुन लॉगइन क...