🎯 UIDAI चा मोठा निर्णय ! - १० वर्षांतून एकदा आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य
Informative Update
🧐 प्रत्येक नागरिकाला देत असलेला आधार क्रमांक कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे गरजेचे आहे - असे केंद्र सरकारने म्हटले आहे
🗣️ आधार क्रमांक अद्ययावत केल्यामुळे आधार तपशिलाची सेंट्रल आयडेन्टिटीज डेटा रिपॉझिटरीमधील अचूकता कायम राखली जाईल - असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने जाहीर केले
💁♀️ पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?
🖊️ आधार धारकाने आधारसाठी नोंदणी केल्यापासून किमान १० वर्षांतून एकदा तरी आधार अद्ययावत करावे असे , UIDAI ने सांगितले आहे.
💫 आधार क्रमांक धारकाने त्याचे ओळखपत्र, वास्तव्याचा तपशील अशी कागदपत्रे १० वर्षांनी एकदा अद्ययावत करणे आवश्यक आहे
🤔 कसे करता येईल आधार अपडेट ? - आधारकार्ड अपडेट मायआधार या पोर्टलवर जाऊन करता येणार तसेच मायआधार अॅप वापरूनही माहिती अद्ययावत करता येते.
📍 तसेच आधार नोंदणी केंद्रावर जाऊन देखील माहिती अद्ययावत करता येणार आहे - असे UIDAI ने म्हटले आहे
😇 सर्व आधारकार्ड-धारकांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा
Comments