Skip to main content

Posts

Showing posts with the label Whether update

सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज जाहीर - हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी. Wheather Update

🌍 सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज जाहीर - हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी Wheather Update 🧐 सप्टेंबरमध्ये राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होईल, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे. 💁‍♂️  या जिल्ह्यांना अलर्ट जारी ⛈️ पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे 💫 तर सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.  👉 याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. 🙏  हवामान अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांसाठी  - खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

पुढील 48 तासांत राज्यात अतिमुसळधार पाऊस - हवामान विभागाकडून अलर्ट जारी Wheather Update

🌧️ पुढील 48 तासांत राज्यात अतिमुसळधार पाऊस - हवामान विभागाकडून अलर्ट जारी  Wheather Update 🧐 हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे , नाशिकसह राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  💁‍♂️  या जिल्ह्यांना अलर्ट जारी ? -  रायगड, रत्नागिरी, पुणे,  साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला.  ⏲️ 8 ते 10 ऑगस्टला  - ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हपूरला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.  👉 तर याच काळात नाशिक, परभणी, भंडारा, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, गोंदिया, नागपूर, यवतमाळला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे 🙂 राज्यात 48 तासांत अतिमुसळधार - पाऊस पडणार हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा