🌍 सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज जाहीर - हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी
Wheather Update
🧐 सप्टेंबरमध्ये राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होईल, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे.
💁♂️ या जिल्ह्यांना अलर्ट जारी
⛈️ पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे
💫 तर सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
👉 याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
🙏 हवामान अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांसाठी - खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments