Skip to main content

Posts

Showing posts with the label 2022 updates

राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत

  राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या चर्चांना उधाण आलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी हालचाल सुरू आहे. शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा आणि दंड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी शिक्षेला स्थगिती न मिळाल्यामुळे मंत्रिपद कायम ठेवणं शक्य न राहिल्याने हा राजीनामा द्यावा लागला. यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक महत्त्वाचं मंत्रिपद रिक्त झालं असून, त्याच जागेसाठी आता पक्षात चुरस वाढताना दिसत आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हे खातं सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. मात्र हे पद कायमस्वरूपी कुणाला दिलं जाणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अनेक आमदार आणि नेत्यांची नावं चर्चेत आली असून, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अनेक दावेदार, पक्षात अंतर्गत हालचाल मंत्रिपद...

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकाल २०२५ | नाशिक जिल्ह्यात शिवसेना टोपवर

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकाल २०२५ | नाशिक जिल्ह्यात शिवसेना टोपवर   नाशिक जिल्हा शिवसेनाचा बालेकिल्ला  नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यावर आपली पकड अधिक मजबूत केली असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील 11 पैकी एकाही नगरपरिषदेत महाविकास आघाडीला नगराध्यक्षपद मिळवता आलेले नाही. महायुतीचे वर्चस्व, शिंदे शिवसेना आघाडीवर या निकालांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक पाच नगरपरिषदांवर नगराध्यक्षपद मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली छाप सोडली आहे. भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी तीन नगरपरिषदांमध्ये विजय मिळवला आहे. महायुतीतील हे पक्ष काही ठिकाणी स्वतंत्रपणे, तर काही ठिकाणी परस्परविरोधात लढले असले तरी अंतिम निकालात फायदा मात्र महायुतीचाच झाला आहे. महाविकास आघाडीचा संपूर्ण पराभव काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील पक्षांना नाशिक जिल्ह्या...

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर केल्या. या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका या टप्प्यांनुसार घेतल्या जातील. आयोगाने स्पष्ट केले की निवडणुका वेळापत्रकानुसार पार पडतील आणि प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण ठेवावी. तारखांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग निवडणुकीच्या तारखांची घोषणा होत...

1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं अनुदान - शेतकऱ्यांना दिलासा

  1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं अनुदान - शेतकऱ्यांना दिलासा  Govt Updates 🌾 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत - नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार  🏛️ वर्षा बंगला सोडण्याआधी उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले -  बुधवारी मंत्री मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  💁‍♂️ या निर्णयानुसार शेतकऱ्यांना - आता ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार - यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे - 1 जुलै म्हणजे कृषी दिनापासून याची अंलबजावणी केली जाणार आहे  📌 सर्व शेतकऱ्यांसाठी - हि बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 

आता पोस्टमनही आधार कार्ड अपडेट करतील - पहा कशी आहे योजना

आता पोस्टमनही आधार कार्ड अपडेट करतील - पहा कशी आहे योजना Govt. Updates ⏲️ आधार कार्ड हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे , डाक्युमेंट समजले जाते - मात्र ग्रामीण भागात आधार अपडेटची  सुविधा अजून व्यवस्थित पोहचली नाही  😱 ही बाब लक्षात घेऊन UIDAI ने म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने पोस्टमनच्या माध्यमातून हि सुविधा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे 🤷‍♂️ जाणून घ्या याविषयी ? ▪️ UIDAI ने सांगितले , ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन त्यांचे मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करणे, इतर डिटेल्स अपडेट करणे, तसेच मुलांची नोंदणी करणे  ▪️ याकामासाठी देशातील 48000 पोस्टमनना प्रशिक्षण देण्यात येत आहे - तसेच आता या योजनेच्या दुसऱ्या भागात - दीड लाख टपाल अधिकाऱ्यांनाही हे प्रशिक्षण दिलं जाणार  ▪️ त्यासाठी त्यांना डेस्कटॉप किंवा लॅपटॉप बेस्ड आधार किट उपलब्ध करुन दिले जाणार - यामुळे आधार अपडेट करणे खूप सोपे होणार  📌 आधार कार्ड विषयीची माहिती - नक्कीच खूप महत्वाचे आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा   

आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘नो टेन्शन’ - IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा

  आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘नो टेन्शन’ - IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा Knowledge Updates 🚆  असे अनेकदा तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही , कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे. 🧐  आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे , तसेच आयआरसीटीसीवची पेमेंट गेट वे  - सेवाही सुरू होणार - यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही 💁‍♂️ जाणून घ्या याविषयी सविस्तर ? ●  वेबसाईट आणि मोबाईल अॅप वापरणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी iPay अंतर्गत एक तात्काळ रिफंडसाठी फिचर आयआरसीटीसीने सुरू केले आहे.  ●  याचा लाभ घेण्यासाठी युजरला आपल्या बँक खात्याची माहिती एकदाच द्यावी लागेल. तिकीट बुक करताना जी माहिती देण्यात येईल, त्याच माहितीच्या आधारे आणि त्याच बँक खात्यात तिकीट रद्द केल्यावर थेट पैसे जमा केले जातील ●  तसे याआधी तिकीट रद्द केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी लागत होता - मात्र नव्या फिचरमुळे तिकीट ...

🚆 IRCTC चा मोठा निर्णय ! - आता रेल्वेतही असणार ट्रेन होस्टेस

  🚆 IRCTC चा मोठा निर्णय ! - आता रेल्वेतही असणार ट्रेन होस्टेस Railway Update 🗣️ IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ने रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ✒️ यामुळे आता ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर होस्टेस प्रमाणेच ट्रेन होस्टेसची सुविधा मिळणार आहे 🤷‍♂️ काय सांगितले रेल्वे मंत्रालयाने ? ⚡ सध्या ही सुविधा फक्त वंदे भारत एक्सप्रेस,गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये सुरू करण्यात आली आहे - मात्र यानंतर हि सुविधा सर्व प्रीमियम ट्रेनमध्ये देखील दिली जाणार आहे  📝 तसेच ट्रेन होस्टेस ही सुविधा केवळ दिवसा दिली जाईल,मात्र रात्रीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध नसेल - अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे आहे  📍 दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  👌 आता रेल्वे मधेही ट्रेन होस्टेस - ची सुविधा मिळणार हि माहिती प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतराना देखील अवश्य शेअर करा

सर्वसामान्यांना मोठा झटका ! - पुढील महिन्यात एसी, फ्रीजच्या दरात होणार वाढ

😱 सर्वसामान्यांना मोठा झटका ! - पुढील महिन्यात एसी, फ्रीजच्या दरात होणार वाढ Markets Updates 🧐 देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी सोबतच घरगुती गॅसच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे  ✒️ तर दुसरीकडे अन्न, धान्य आणि दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आणि भाजीपाला देखील महाग झाला आहे  💁‍♂️ दरम्यान पुढील महिन्यात - होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीन या सारख्या वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे 💫 तसे सध्या वॉशिंग मशीन, एसी, फ्रीज यासारख्या व्हाईट गुड्सवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो , मात्र आता त्यावर 28 टक्के जीएसटी आकारण्यात येण्याची शक्यता आहे  🙏 एसी फ्रीजच्या दरात वाढ होणार - हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा   

🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - होम लोन, कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ

🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - होम लोन, कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ Loan Rate Updates ✒️ सर्व एसबीआयचा ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - SBI ने आपल्या होम लोन आणि कार लोनच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे , बँकेकडून लोनच्या व्याज दरात 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे  📱 तसेच कोणत्या लोनवर किती व्याज दर वाढवण्यात आले , याची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे  🤷‍♂️ पहा कसे आहे नवे व्याज दर ? ● तसे यायाधी SBI कडून ग्राहकांना 6.65 टक्के व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र आता त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आता होम लोन 6.75 टक्के करण्यात आला आहे ● तर यायाधी कार लोन 6.95 टक्क्यांनी उपलब्ध करून देण्यात येत होते , मात्र त्यामध्ये 0. 10 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने ते 7.05 टक्क्यांवर पोहोचले आहे  😇 दरम्यान SBI च्या ग्राहकांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा  

🤷‍♂️ रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकीट काढतांना पत्ता टाकण्याची गरज नाही

  🤷‍♂️ रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकीट काढतांना पत्ता टाकण्याची गरज नाही  IRTC Updates ⚡तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे - प्रवाशांना यापुढे तिकीट काढताना त्यांना जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता भरावा लागणार नाही. 💁‍♂️ पहा कसा आहे हा निर्णय ▪️ कोरोनाकाळात रेल्वे तिकीट बुक करताना IRCTC वेबसाईट आणि अ‍ॅपवर डेस्टिनेशन पत्ता भरणे अनिवार्य करण्यात आले होते.  ▪️ कारण डेस्टिनेशन अ‍ॅड्रेसने साथीच्या आजारादरम्यान कोविडच्या पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात मदत केली.  ▪️ त्यामुळे ते भरल्याशिवाय तिकीट काढता येत नव्हते. मात्र यामुळे नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता 🙏 मात्र रेल्वे मंत्रालयाने डेस्टिनेशनबाबत - आदेश जारी करून हा नियम बंद केला - रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

💁‍♂️ दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल -तर तक्रार करता येणार - पहा कशी होणार कारवाई

  💁‍♂️   दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल -तर तक्रार करता येणार - पहा कशी होणार कारवाई  Informative Updates 🔥   बाजारात सामान खरेदी करताना कॅरी बॅगसाठी वेगळा चार्ज भरावा लागतो - मात्र सरकारने देशातील ग्राहकांना काही अधिकार दिले आहेत  📌   नव्या कायद्यानुसार, दुकानदाराने पिशवीसाठी पैसे आकारल्यास, ग्राहकाला याची तक्रार करून, त्यावर कारवाई करता येणार आहे. 💁‍♂️  पहा याविषयी आणखी सविस्तर माहिती ? 🔰   नव्या कायद्यानुसार, कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे आता दंडनीय असणार आहे म्हणजे कॅरी बॅगच्या नावाने 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये आकारले गेल्यास, त्यासाठी दंडाची तरतूद केली आहे 🔰  तशी ग्राहक मंचाने पिशवीसाठी पैसे आकारल्यास दुकानदारावर दंड आकारण्यास याआधी पण सुरुवात केली होती ,दरम्यान आता या नव्या कायद्यात आणखी कठोर तरतूदी करण्यात आल्या आहेत  🔰 आणि महत्वाचे म्हणजे यासाठी ग्राहकांना देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात खटला दाखल करण्याचा अधिकार असेल असे स्पस्ट करण्यात आले - तसे आपण या आणि या व्यातिक्त देखील...

😱 खाद्य तेल होणार आणखी महाग ! - पहा काय आहे कारण ?

😱 खाद्य तेल होणार आणखी महाग ! - पहा काय आहे कारण ? Breaking Updates 🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात , १ फेब्रुवारीपासून खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात आली होती ⚡ मात्र आता उत्तरेकडील पाच राज्येही १ एप्रिलपासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणली आहेत - मात्र त्यामुळेही दरवाढीवर लगाम लागण्याची चिन्हे नाहीत 📝 तसेच आता सर्व राज्यांत तेलबिया, तेल साठ्यावरील मर्यादा डिसेंबर २०२२ पर्यंत लागू राहणार आहे - असे केंद्र सरकारने सांगितले  🤷‍♂️ पहा काय आहे कारण ? 🔰 तसे दरवर्षी भारत ३० लाख टन सूर्यफूल तेल आयात करते - त्यापैकी ७० टक्के सूर्यफूल तेलाची आयात एकट्या युक्रेनमधून होते - मात्र आता रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली आहे  🔰 याव्यतिरिक्त सोयाबीन तेलाची आयात अर्जेटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते तेथील , मात्र यावर्षी हवामानातील बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाली असून सोयाबीन तेलाची आवक अपुरी पडत आहे 🔰  त्यामुळे मार्च महिन्यात स्थिरावलेले तेलाचे दर येत्या काही दिवसांत पुन्हा वाढणा...

📣 RBI ची मोठी घोषणा ! - आता ATM कार्ड नसतानाही काढता येणार पैसे

📣 RBI ची मोठी घोषणा ! - आता ATM कार्ड नसतानाही काढता येणार पैसे Banking Updates 🧐 RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले कि , सध्या देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे ✍️ मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण टाळण्यासाठी ATM कार्ड ऐवजी आता UPI चा वापर केला जाईल  🤷‍♂️ कसे आहे कार्डलेस कॅश सिस्टम ? 💳 आता कोणत्याही बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची आवश्यकता भासणार नाही - ही सेवा 24×7 संपूर्ण देशभरात उपलब्ध असेल 📱 या सिस्टिमच्या माध्यमाने पैसे काढण्यासाठी मोबाईल पीन जनरेट केला जाईल - तसेच या सुविधेत UPI च्या माध्यमाने ट्रांझॅक्शन पूर्ण होईल 💰 हि सुविधा ग्राहकांना केवळ स्वतः पैसे काढण्यासाठीच वापरता येईल , तसेच यामध्ये ट्रांझॅक्शन लिमिटही असेल  💁‍♂️ अशा पद्धतीने काम करेल ही सिस्टम ✒️ मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसह सेव्हिंग अकाउंट होल्डर्सना ही सुविधा मिळेल 📝 बँकांकडून लावल्या जाणाऱ्या कार्डलेस एटीएमवर गेल्यानंतर, पैसे काढण्यासाठी मोबाईलवर येणारा कोड लिहावा लागेल ⚡ तसेच या सिस्टमच्या मदतीने केवळ 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतच व्यवहार ...

🙋‍♂️ आज पेट्रोल सोबत CNG चे दर वाढले- जाणून घ्या नवे दर

 🙋‍♂️ आज पेट्रोल सोबत CNG चे दर वाढले- जाणून घ्या नवे दर Breaking Updates 💰 अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ होत आहे - आज 6 एप्रिल ला पेट्रोल आणि डिझेल च्या दरात 80 पैशांनी वाढ झाली  तर आज मुबंईत , CNG मध्ये 7 रुपयांनी आणि PNG च्या दरात 5 रुपयांनी वाढ झाली आहे  💁🏻‍♀️ आजचे नवे दर ? ▪️ पेट्रोल -  120.51 रुपये लिटर  ▪️ डिझेल  - 104.77 रुपये लिटर  🎯 अजूनही इंधनाच्या दरात वाढ होत आहे -  प्रत्येक वाहन धारकांसाठी हि माहिती महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा

🔖 दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी

  🔖 दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी State Board Updates 📣 यावेळेस कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारचीच्या परीक्षा झाल्या आहेत - त्यामुळे निकाल केंव्हा लागेल ? 🤔 असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे - याबाबत राज्य शिक्षण मंडळाने महत्वाची माहिती दिली आहे  🤷‍♂️ काय म्हटले शिक्षण मंडळाने ? - राज्य शिक्षण मंडळाने सांगितले , यावर्षी बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार , तर दहावीचा निकाल १८ जूनपर्यंत जाहीर होणार आहे  🎯 दहावी बारावीच्या निकालाची बातमी - विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

😱 महिला सरंपचांना ,दरवर्षी मिळणार १० लाखाचा निधी - पहा कशी आहे योजना

😱 महिला सरंपचांना ,दरवर्षी मिळणार १० लाखाचा निधी - पहा कशी आहे योजना Yojna Updates   👩🏻 राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती आहेत - त्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंच सांभाळत आहेत.  💰 कुटुंबाचा सांभाळ करीत गावचा कारभार हाकणाऱ्या महिला सरंपचांना - आता राज्य सरकारकडून दरवर्षी दहा लाखांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार  🤷‍♂️ वित्त विभागाकडे प्रस्ताव  ● ग्रामविकास विभागाने ही योजना कागदावर तयार केली , तर आता वित्त व नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे.  ● त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना ठेवली जाईल - दरम्यान, या योजनेला नेमके कोणाचे नाव द्यायचे हे अजूनही निश्चित झालेले नाही.  ● मात्र ग्रामविकास विभागाने या योजनेचा प्रस्ताव तयार केला असल्याने -  महिला सरपंचाना या नक्कीच फायदा होईल - याविषयी आणखी काही अपडेट आले -  तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू  ● महिला सरंपचांसाठी असलेली - हि यॊजना खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

📣 घरगुती वीज दरात झाली घट ! जाणून घ्या नवे दर

  📣 घरगुती वीज दरात झाली घट ! जाणून घ्या नवे दर Govt. Updates 👌 आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महावितरणचे वीजदर २ टक्क्यांनी, टाटाचे वीजदर ४ टक्क्यांनी कमी होत आहे , अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे. - तर बेस्टचे वीजदरही स्थिर राहातील 💁‍♂️ कसे आहे महावितरणचे दर पत्रक  ▪️ १०० युनिट वर्गवारीतील ग्राहकांना - आता प्रति युनिट ४ रुपये ८२ पैशांऐवजी ४ रुपये ७१ पैसे  ▪️ १०१ ते ३०० युनिटच्या ग्राहकांना - ८ रुपये ७२ पैशांऐवजी ८ रुपये ६९ पैसे ▪️ ३०१ ते ५०० युनिट ग्राहकांना -  ११ रुपये ७४ पैशांऐवजी ११ रुपये ७२ पैसे.  ▪️ व्यावसायिक  ग्राहकांना -  प्रति युनिट ११ रुपये २० पैशांऐवजी १०.९५ पैसे आकारले जातील 📌 आज पासून वीज दरात बदल झाले- हि माहिती सर्व सामान्यांसाठी महत्वाची आहे ,आपण इतरांना अवश्य शेअर करा 

⛽ गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ ! - पहा कसे आहेत नवे दर

⛽ गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ ! - पहा कसे आहेत नवे दर LPG Updates 💰 जागतिक स्तरावर रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढलेत - त्यामुळे आज 1 एप्रिल रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी झालेत - आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे 💁‍♂️ कसे आहेत नवे दर ? 🔰 14.2 किलोग्रॅम - 949.50 रुपये 🔰 19 किलोग्रॅम - 2205 रुपये 😇 गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली -  हि माहिती, सर्व सामान्यांसाठी , खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा  

😇 राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर - पालकांसाठी महत्वाची बातमी

😇  राज्यातील शाळांना 2 मे पासून  उन्हाळी सुट्टी जाहीर - पालकांसाठी महत्वाची बातमी   Breaking Updates 🥳 राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असणार आहे. 💁‍♂️  नवीन शैक्षणिक वर्ष -  13 जून पासून सुरु होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे. 🎯 2 मे पासून शाळांना सुट्या लागतील -   विद्यार्थी आणि पालकांसाठी,  हि माहिती महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा   

आता इंजिनिअरिंग साठी ,गणित विषय वैकल्पिक असणार - पहा कसा आहे निर्णय

  😱 आता इंजिनिअरिंग साठी  ,गणित विषय वैकल्पिक असणार - पहा कसा आहे निर्णय  Govt. Updates ✍️ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने ,  इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये गणित विषयाचं अध्ययन करणं वैकल्पिक केले आहे.  💁‍♂️ गणित वैकल्पिक म्हणजे काय ?   म्हणजे आता अभियांत्रिकीच्या 10 अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी - बारावीला गणित विषय नसला तरी प्रवेश घेता येईल - यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, बायो टेक्नॉलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रुनरशीप आदींचा समावेश आहे. 🙏 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने - घेतलेला हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा