आता घरबसल्या बनवता येईल रेशन कार्ड - 11 राज्यांत प्रायोगिक तत्वावर नवी सुविधा सुरु. Govt. Yojna Update
👌 आता घरबसल्या बनवता येईल रेशन कार्ड - 11 राज्यांत प्रायोगिक तत्वावर नवी सुविधा सुरु Govt. Yojna Update ✍️ आता रेशन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयात खेपा माराव्या लागणार नाहीत. कारण केंद्र सरकारने कॉमन रजिस्ट्रेशन ही नवी सुविधा सुरू केली त्यामुळे आपल्याला घरबसल्या रेशन कार्ड बनवता येणार ✒️ एका आकडेवारीनुसार, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत , देशातील जास्तीत जास्त 81.35 कोटी लोकांचा समावेश करता येऊ शकतो. सध्या देशात या कायद्याअंतर्गत 79.77 कोटी लोकांना सब्सिडीवर अन्नधान्य देण्यात येते. ⏲️ तर उरलेल्या 1.58 कोटी अतिरिक्त लोकांना त्यामध्ये जोडता यावे म्हूणन सरकारने रेशन कार्ड बननवण्यासाठी सामायिक नोंदणी सुविधा सुरू केली आहे. 🤷♂️ काय सांगितले केंद्र सरकारने ? ▪️ केंद्र सरकारचे अन्नधान्य सचिव सुधांशन पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्टला कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी ( माझे रेशन – माझा अधिकार) सुरू करण्यात आली. ▪️ राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा अंतर्गंत येणार्या सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी , पात्र ठरणाऱ्या लोकांना शोधून त्यांचे रेशन कार्ड बनवण्यात येईल....