आता घरबसल्या बनवता येईल रेशन कार्ड - 11 राज्यांत प्रायोगिक तत्वावर नवी सुविधा सुरु. Govt. Yojna Update
👌 आता घरबसल्या बनवता येईल रेशन कार्ड - 11 राज्यांत प्रायोगिक तत्वावर नवी सुविधा सुरु
Govt. Yojna Update
✍️ आता रेशन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयात खेपा माराव्या लागणार नाहीत. कारण केंद्र सरकारने कॉमन रजिस्ट्रेशन ही नवी सुविधा सुरू केली त्यामुळे आपल्याला घरबसल्या रेशन कार्ड बनवता येणार
✒️ एका आकडेवारीनुसार, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत , देशातील जास्तीत जास्त 81.35 कोटी लोकांचा समावेश करता येऊ शकतो. सध्या देशात या कायद्याअंतर्गत 79.77 कोटी लोकांना सब्सिडीवर अन्नधान्य देण्यात येते.
⏲️ तर उरलेल्या 1.58 कोटी अतिरिक्त लोकांना त्यामध्ये जोडता यावे म्हूणन सरकारने रेशन कार्ड बननवण्यासाठी सामायिक नोंदणी सुविधा सुरू केली आहे.
🤷♂️ काय सांगितले केंद्र सरकारने ?
▪️ केंद्र सरकारचे अन्नधान्य सचिव सुधांशन पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्टला कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी ( माझे रेशन – माझा अधिकार) सुरू करण्यात आली.
▪️ राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा अंतर्गंत येणार्या सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी , पात्र ठरणाऱ्या लोकांना शोधून त्यांचे रेशन कार्ड बनवण्यात येईल.
▪️ तसेच जे लोक पात्र आहेत मात्र काही कारणांमुळे त्यांचे रेशन रद्द करण्यात आली होती, अश्या पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून नियमितपणे नवी कार्डेही देण्यात येतील
✨ दरम्यान कोणत्या 11 राज्यांत हि सुविधा चालू करण्यात आली आहे तसेच हि सुविधा कशी सुरु करायची याविषयी आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू
📍 आता घरी बसून - रेशनकार्ड- बनवता येईल हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments