वीज बिलातील दरवाढ ऑक्टोबर पर्यंत राहील - जाणून घ्या सविस्तर
Informative Update
✍️ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार - यंदा इंधन दरात पुन्हा वाढ झाली आहे.
💰 त्यामुळे पुढील 5 महिने ग्राहकांकडून हा वाढीव खर्च वसूल केल्या जाणार - तर वीज बिलातील ही वाढ जून ते ऑक्टोबर दरम्यान राहील.
💁♂️ दरवाढ कितीने होणार
▪️ संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे 3.3 कोटी विद्युत ग्राहक आहेत
▪️ तर या दरवाढीनुसार , घरगुती ग्राहक जर 0-100 युनिट वीज वापर करतील - त्यांना 65 पैसे प्रति युनिट अधिक पैसे मोजावे लागतील
▪️ तर 101-300 युनिट विद्युत वापर करणा-या ग्राहकाला 1 रुपया 45 पैसे प्रति युनिट जास्त मोजावे लागतील
▪️ 301-500 युनिट विद्युत वापर असणा-या ग्राहकांच्या खिश्यावर प्रत्येक बिलात प्रति युनिट 2.05 रुपयांचा बोजा पडेल
▪️ तर 500 युनिट पेक्षा अधिक विद्युत वापर करणा-या ग्राहकांना प्रति युनिट 1 रुपये 35 पैसे - तर व्यावसायिक ग्राहकांना 2.20 रुपये प्रति युनिट अधिभार पडेल
😇 वीज ग्राहकांसाठी - हि माहिती नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments