💰 चेकने व्यवहार करण्यासाठी होणार नवे नियम लागू - पहा कसे आहेत नियम
Govt. Update
📝 गेल्या काही दिवसांत चेक बाऊन्स होण्याची प्रकरणे वाढली आहेत - चेक बाऊन्सची प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्यासाठी वित्त मंत्रालयाने नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.
✨ त्यात अनेक महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यामध्ये चेक बाऊन्स प्रकरणांबाबत नियम अधिक कडक केले जाणार असल्याचे - अधिकाऱ्यांनी म्हटले आहे
💁♂️ कोणते नियम होणार लागू ?
▪️ धनादेश जारी करणाऱ्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास त्या व्यक्तीच्या इतर बॅंक खात्यातून रक्कम कापून घेतली जाऊ शकते.
▪️ चेक बाऊन्सचे प्रकरणं कर्ज डिफॉल्ट म्हणून हाताळलं जाईल, त्याची क्रेडिट माहिती कंपन्यांना कळवली जाईल. जेणेकरून त्या व्यक्तीचे गुण कमी करता येतील, ज्याच्या त्याच्या सिव्हील स्कोअरवर परिणाम होईल.
▪️ चेक बाऊन्सची केस कोर्टात दाखल केली जाऊ शकते. हा दंडनीय गुन्हा असून, चेकच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
▪️ चेक बाऊन्स झाल्यास काही दिवसांसाठी संबंधित व्यक्तीला बँकेतून पैसे काढण्यावर बंधन आणले जाऊ शकते..
▪️ चेक बाऊन्स रोखण्यासाठी वरील सर्व गोष्टींचा विचार सुरु आहे. लवकरच हे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.
🙏 चेकद्वारे व्यवहार करणाऱ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments