😱 अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम
Govt. Update
📝 असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे.
⏲️ त्यानुसार जी व्यक्ती आयकर भरत असेल अश्या व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 नंतर या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे.
🤷♂️ कशी आहे अधिसूचना ?
▪️ तुम्हाला माहिती असेल , अटल पेन्शन योजना आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत.
▪️ वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
▪️ तसेच अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे पैसे ग्राहकांना परत केले जातील.
🤔 पेन्शन किती मिळते ? - अटल पेन्शन योजना ही भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी चालवली जाते. अटल पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शनची हमी दिली जाते, -
💰 जी 1,000 रुपये 2,000 रुपये 3,000 रुपये 4,000 रुपये किंवा 5,000 रुपयांपर्यंत दिली जाते. ग्राहक या खात्यात पैसे जमा करतात, त्यानुसार वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन मिळते.
📍 जी व्यक्ती आयकर भरत असेल - अशी व्यक्ती APY मध्ये गुंतवणूक करू शकणार नाही - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments