🧐 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी - शेतीचे पंचनामे आता सॅटेलाईट बेस होणार
Govt. Update
🌧️ राज्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा राज्य सरकारकडे लागलेल्या असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
🤷♀️ काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
🗣️ उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की “शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. शेतीत नुकसान झाल्यास पंचनामे करावे लागणार नाहीत.
🛰️ म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल. त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत केली जाईल. लवकरच अशी सिस्टीम उभारली जाणार आहे.
👉 दरम्यान राज्यात ओला - दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. परतीचा पाऊस नेहमीच होतो. शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेत आहोत.
💵 तसे सगळे पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा कळेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत करु. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
🙏 शेतीचे पंचनामे आता सॅटेलाईट बेस होणार - हि बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments