😱 डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - १ ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम
Govt. Update
🧐 क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या व्यवहार करण्याच्या नियमात १ ऑक्टोबर पासून महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत - तसा हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू केला जाणार होता.
✒️ पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा नियम लागू करण्याची मुदत पुढे ढकलून 30 जून 2022 केली होती. मात्र आता आरबीआयने आपली शेवटची मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली आहे
💁♂️ पहा कसे आहेत नियम ?
▪️ आरबीआय आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन’ नावाचा एक नियम आणणार आहे.
▪️ त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार करण्यासाठी 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी टाकावा लागतो.
▪️ तसेच सर्व माहिती अचूक भरल्यानंतरच व्यवहार यशस्वी होतो. मात्र यामध्ये टोकनायझेशन नसल्याने फसवणूक जास्त प्रमाणात होत होती
▪️ मात्र आता जेव्हा तुमच्याकडून तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती टोकन स्वरूपात शेअर केली जाते तेव्हा फसवणूकचा धोका कमी होतो.
▪️ याचबरोबर कार्डची डिटेल टोकनायझेशनमध्ये एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाते. या कोडच्या साहाय्याने पेमेंट करणे शक्य होईल.
▪️ या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या कार्डचा CVV नंबर आणि वन टाईम पासवर्डची गरज लागेल आणि अतिरिक्त पडताळणीसाठीही संमती द्यावी लागणार आहे त्यामुळे व्यवहार सुरक्षित होईल - असेहि RBI ने सांगितले आहे
📍 क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी - ही बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments