👮♂️ मोठी बातमी ! - 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीची प्रक्रिया होणार सुरु
Govt. Update
🧐 राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे
⏲️ त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालकांकडून पोलीस आयुक्तांसह पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
💁♀️ जाणून घ्या सविस्तर
🖊️ यामध्ये संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. तर रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे.
💫 सर्वाधिक जागा मुंबई, पुणे शहर आणि ग्रामीण, मीरा भाईंदर, लोहमार्ग मुंबई याठिकाणी आहेत. मुंबईत ६ हजार ७४० तर मिरा भाईंदरमध्ये ९८६ जागा तर पुणे शहरमध्ये ७२० पदे, पुणे ग्रामीणमध्ये ५७९ आणि लोहमार्ग मुंबईत ६२० पदे रिक्त आहेत.
🖥️ दरम्यान, 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
📍 तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू
😇 1 नोव्हेंबरपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार - हि माहिती स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments