😱 मोठी बातमी ! - एसटीच्या तिकिट दरात मोठी वाढ
Govt. Update
📝 एसटी महामंडळाकडून दिवाळीत महसूल वाढीसाठी दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जाते. शिवसेना नेते दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना, त्यांनी दिवाळीच्या काळात एसटीची अशी हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता
🤷♀️ किती रुपयांनी झाली वाढ ?
▪️ एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळीत 10 दिवसांसाठी तिकिट दरात 5 ते 75 रुपयांची हंगामी वाढ केली आहे. ही भाडेवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, ती 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.
▪️ तर 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांना नेहमीप्रमाणेच एसटीचे तिकीट दर असतील, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
▪️ तसेच एसटीची ही हंगामी दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व एसी बसेसला लागू राहील.
▪️ मात्र, शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’, तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना ही दरवाढ लागू नसेल.
🙂 एसटीच्या तिकिट दरात वाढ झाली - हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा
Comments