👌 एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! - राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर
Govt. Update
💰 एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या ताेंडावर राज्य सरकारनं एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
📝 मात्र एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा पगारासाठी 360 कोटी रुपये निधीची गरज असते, पण सरकारनं 300 कोटींचीच मदत जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
🗣️ मागणीनुसार निधी द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
💁♂️ जाणून घ्या सविस्तर
💸 एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात. मात्र, गेल्या 3 महिन्यांत राज्य सरकारने फक्त 600 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर झाले नाहीत.
🚌 आम्ही जेवढ्या निधीची मागणी केली होती, तेवढा निधी दिवाळीआधी द्यावा, अन्यथा राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा बरगे यांनी दिला आहे.
📌 आपण थोडस सहकार्य करा - हि माहिती इतरांना देखील शेअर करा
Comments