Skip to main content

⛽ सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ! - आता वर्षभरात मिळणार फक्त 15 सिलिंडर Breaking Update

⛽  सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ! - आता वर्षभरात मिळणार फक्त 15 सिलिंडर

Breaking Update

🧐 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी विनाअनुदानित घरगुती गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना केव्हाही आणि वर्षभर लागलीत तेवढे सिलिंडर घेता येत होते. मात्र आता घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 

✒️ नव्या नियमानुसार, ग्राहकाला वर्षभरात केवळ 15 सिलिंडरच मिळतील - तसेच एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला असून ग्राहकांना महिन्यात दोन पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाहीत - असेहि केंद्र सरकारने म्हटले आहे 

🤷‍♂️  आणखी काय सांगितले केंद्र सरकारने ? 

💫 अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी असणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळतील. तर यापेक्षा जास्त सिलिंडरची आवश्यकता असेल तर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत.

📝 रेशनिंग अंतर्गत एक ग्राहक महिन्यात फक्त दोन घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकतो. एखाद्या ग्राहकाला जास्त सिलिंडर लागत असल्यास त्याचा पुरावा देऊन तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच अतिरिक्त रिफिल मिळेल.

🙏  आता वर्षभरात फक्त 15 सिलिंडर  - मिळणार हि बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

Comments