🎯 MHT CET चे रजिस्ट्रेशन सुरु झाले ! -विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी
✍️ राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमधील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या , MHT CET 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली
⏲️ 10 फेब्रुवारी अर्जाची नोंदणी सुरु झाली - तर 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल
🤝अर्ज कुठं करायचा ? - शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता येणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थी mhtcet2022.mahacet.org या पोर्टलला भेट देऊ शकतात
🤝 सीईटी परीक्षेच्या नोंदणीला - सुरवात झाली , हि माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
📣 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर ! - पहा सर्वसामान्यांनवर कसा होईल परिणाम ?
🧐 रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण आज जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केला नाही म्हणजेच रेपो रेट 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे - तर रिव्हर्स रेपो दर 3.35 ठेवण्यात आला आहे
🤷♂️ रेपो रेट म्हणजे काय ?
बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते त्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट असे म्हणतात
🤔 रिझर्व्ह रेपो रेट म्हणजे काय ?
बँकाकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँक अल्प मुदतीसाठी रिझर्व बँकेकडे जमा करतात त्या रकमेवर रिझर्व बँक ज्या व्याजदराने व्याज देते त्या दराला रिझर्व रेपो रेट असे म्हणतात
😇 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून - पतधोरण जाहीर झाले हि माहिती सर्व नागरीकांसाठी ,खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
🔖 सिनेमागृह आणि हॉटेल पूर्ण क्षमतेने होतील चालू - पहा काय म्हणाले राजेश टोपे ?
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - राज्यात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली होती - मात्र आता कोरोनाची लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने जानेवारी महिन्यात लागू केलेले निर्बंध हटवले आहेत
🗣️ त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक केला जाईल - अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे
🤷♂️ पहा काय म्हणाले राजेश टोपे ?
🏬 कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे - त्यामुळे नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येतील
😇 सिनेमागृह आणि हॉटेल - पूर्ण क्षमतेने चालू होतील हि माहिती सर्व नागरीकांसाठी , नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
😱 बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ! - आज ऑनलाईन मिळणार - असे करा डाऊनलोड
✍️ बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट आज बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे
🎯 कसं कराल डाऊनलोड? - सर्वात आधी mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा. त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन - आपण हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करु शकता
💁♂️ हॉल तिकीट बाबत महत्वाचे ?
🔰 ऑनलाईन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत - कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
🔰 हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास , संबंधित शाळा महाविद्यालय पुन्हा प्रिंट काढून - त्यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत' (डुप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट देते
🔰 आज दुपारी एक वाजल्यापासून - बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध असेल - हि माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments