केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! - सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी
🧐 देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ जारी केला आहे
📍 यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल - त्यानुसार यावर्षी 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येईल- असे केंद्र सरकारने सांगितले
आणखी काय सांगितले केंद्र सरकारने ?
🔰 नव्या नियमांनुसार -1 जुलै 2022 पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल -
🔰 यामध्ये झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यास बंदी असेल -
🔰 तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिकचे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी असेल - असे केंद्र सरकारने सांगितले
🙏 केंद्र सरकारने - घेतलेला हा निर्णय आपल्यासाठी , नक्कीच खुप महत्वाचा आहे - आपण थोडस सहकार्य करा , इतरांना देखील शेअर करा
Comments