पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये होणार रूपांतर ! - पहा वाहनात नेमका काय बदल होईल
Govt. Updates
✍️ दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण धोरण लागू केले जात आहे - या अंतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे
🚗 मात्र यामुळे वाहनात नेमके काय बदल होईल - याविषयी आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ
🤷♂️ पहा वाहनात काय बदल होईल ?
⚡ तसे तुम्हाला माहिती असेल , आतापर्यंत लोकांकडे जुन्या गाड्या इतर राज्यात विकण्याचा किंवा भंगारात काढण्याचा पर्याय होता - मात्र या धोरणामुळे लोकांना त्याच वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करता येईल
🚙 याचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांना होईल ज्यांच्याकडे 10 वर्षे जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षे जुनी पेट्रोल कार आहे - तसेच एका कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये खर्च येईल
📌 दरम्यान वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी काही नियम देखील लागू केले आहेत - मात्र हा मॅसेज थोडा मोठा होत असल्याने ते नियम आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू
👌 केंद्र सरकारने लागू केलेले - हे धोरण वाहन धारकांसाठी , नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे नियम लागू - प्रत्येकाने वाचा
Important Updates
🧐 तसे तुम्हाला माहितीअसेल , याआधीच्या मॅसेज मध्ये आपण दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर केले जाईल याविषयी माहिती घेतली
📝 दरम्यान या मॅसेज मध्ये आपण या वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी कुठले नियम असतील याविषयी जाणून घेऊ
🤷♂️ पहा कसे असतील नवे नियम
● जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्याचे काम केवळ सरकारने मान्यता केलेल्या केंद्रांवर केले जाईल
● इंस्टॉलरला उत्पादक किंवा पुरवठादाराकडून इलेक्ट्रिक किट खरेदी करावी लागेल - इंस्टॉलरची जबाबदारी फक्त कारमध्ये किट बसवण्यापुरतीच मर्यादित असेल
● तसेच वाहनात इलेक्ट्रिक किट बसवता येईल की नाही हे ठरवणेही इंस्टॉलरचे काम असेल - ज्या वाहनांमध्ये हे किट बसवले जाईल, त्यांची वर्षातून एकदा फिटनेस चाचणी करणे आवश्यक आहे
😇 वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर - करण्यासाठी लागू केलेले हे नियम वाहन धारकांसाठी ,खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments