वाहनांच्या वायुप्रदूषण चाचणीच्या दरात वाढ ! - वाहन धारकांसाठी मोठी बातमी
Govt. Update
✒️ तसे तुम्हाला माहिती असेल , वाहनांच्या पीयूसी चाचणीच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे मांडण्यात आला होता
🗣️ दरम्यान या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी दिली आहे
💸 त्यानुसार दुचाकी पीयूसी चाचणीच्या दरात १५ रुपये आणि चारचाकी वाहनाच्या दरात ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे
💁♂️ कसे आहेत नवे दर ?
🏍️ दुचाकी पीयूसी चाचणीसाठी याआधी 35 रुपये खर्च येत होता , मात्र यासाठी आता 50 रुपये मोजावे लागणार आहेत
💰 तर पेट्रोलवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनासाठी 70 रुपये ऐवजी आता 100 रुपये द्यावे लागतील
🚗 याचबरोबर सीएनजी, एलपीजी वर चालणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी आधी 90 रुपये ऐवजी आता 125 रुपये द्यावे लागतील
📝 तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना आधी 110 रुपये खर्च येत होता, पण आता 150 रुपये लागणार आहेत
📌 वाहनांच्या पीयूसी चाचणीच्या दरात वाढ झाली - ही माहिती वाहनधारकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments