कर्जदाराचे मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते ? - पहा कसे आहेत नियम
Knowledge Updates
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - अनेक जण बँकेकडून कर्ज घेत असतात , मात्र अनेक वेळा दुर्दैवी घटनेत कर्जदाराचा मृत्यू होते , तेव्हा बँकेला कर्जाची परतफेड कोण करणार असे प्रश्न अनेकांना पडतात
✒️ तर यासाठी बँकेने काही नियम देखील काढलेले आहेत - ते आपण या मॅसेज मध्ये समजून घेऊ
🏠 गृहकर्ज - (Home Loan)
▪️ गृहकर्ज घेतले जाते तेव्हा घराची कागदपत्रे कर्जदाराकडून गहाण ठेवली जातात - म्हणजे कर्ज सुरु असेपर्यंत घर गहाण असते
▪️ मात्र कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड करण्याचा भार सहकर्जदारावर असतो किंवा ती रक्कम व्यक्तीच्या वारसाद्वारे दिली जाऊ शकते
▪️ तसेच सहकर्जदाराला ही जबाबदारी तेव्हाच मिळते जेव्हा तो कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत असतो. तसे न झाल्यास बँक घराचा लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल करते
💁♂️ वैयक्तिक कर्ज - (Personal Loan)
▪️ वैयक्तिक कर्ज सुरक्षित नसल्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी इतर कोणावरही येत नाही त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूबरोबर कर्जही संपते
🚗 वाहन कर्ज - (Car Loan)
▪️ वाहन कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे, त्यामुळे ते घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या घरातील कोणीही व्यक्ती त्याची परतफेड करू शकते, किंवा बँक कार विकून ते वसूल करते
💁♂️ कर्जदाराचे मृत्यू झाल्यास - कर्जाची रक्कम कोण भरते हि माहिती आपल्यासाठी ,खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments