📣 सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! - अविवाहित महिलेला 24 आठवड्याच्या गर्भपातास परवानगी
Govt. Update
⏲️ सर्वोच्च न्यायालयाने २१ जुलैला अविवाहित महिलेला 24 आठवड्याचा गर्भपात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे
✍️ जो AIIMS दिल्लीने स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाच्या अधीन आहे. त्यामुळे स्त्रीच्या जीवाला धोका न होता गर्भपात केला जाऊ शकतो
🤷♂️ काय सांगितले सुप्रीम कोर्टाने ?
● सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे कि , आम्ही असे मानतो की याचिकाकर्त्याला अवांछित गर्भधारणा सहन करण्यास परवानगी देणे हे संसदेच्या हेतूच्या विरोधात जाईल
● तसेच अविवाहित महिला असल्याच्या आधारावर याचिकाकर्त्यांची परवानगी नाकारली जाऊ नये, केवळ तिच्या अविवाहित असल्याच्या आधारावर तिला कायद्यांतर्गत नाकारले जाऊ शकत नाहीत
● उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की, अविवाहित स्त्री, जीची गर्भधारणा सहमतीच्या नातेसंबंधातून उद्भवते, ती वैद्यकीय समाप्ती गर्भधारणा नियम, 2003 (Medical Termination of Pregnancy Rules, 2003) अंतर्गत येत नाही
📍 सुप्रीम कोर्टाने - घेतलेला हा निर्णय खूप महत्वाचा आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments