🎯 आता ट्रॅफिक पोलीस नाही देणार तुमच्या गाडीला हात - पहा कसे आहेत नवे नियम
Govt. Update
✍️ कार चालवणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे - आता ट्रॅफिक पोलीस आपल्याला विनाकारण अडवू शकणार नाहीत, तसेच तुमच्यावर दंडात्मक कारवाईही करू शकणार नाही
💫 काही दिवसापूर्वी याबाबत एक सर्क्युलर ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये जारी करण्यात आले आहे
💁♂️ पहा कसे आहेत नियम ?
🔰 नव्या नियमानुसार ट्रॅफिक पोलीस वाहनांची चेकिंग करणार नाहीत. ते केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवतील. जर ट्रॅफिकच्या वेगावर काही परिणाम झाला, असेल तरच ते कुठल्याही गाडीची तपासणी करतील
🔰 रस्त्यांवर ट्रॅफिक वाढत असल्यामुळे सर्व वाहतूक पोलिसांना गाड्यांची तपासणी करणे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
🔰 मात्र जर मोटार चालक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असेल तर वाहतूक पोलीस त्यांना मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार आरोपी करू शकतात
🔰 मात्र वाहतूक पोलीस केवळ वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाविरोधात कारवाई करतील, पण वाहनांची तपासणी करणार नाहीत
✒️ दरम्यान सर्व वाहन-धारकांसाठी - हे नियम खूप महत्वाचे आहेत - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments