📰 महत्वाच्या बातम्या वाचा✌🏻मिनिटांत..
🌊 अखेर ठरलं ! जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होणार..
अखेर जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचं ठरले असून, धरणातील पाणीसाठा ९० टक्के झाल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा १७९८ दलघमी असून तो १९५३ दलघमी झाल्या नंतरच म्हणजेच, ९० टक्के साठा झाल्यानंतरचं पाणी सोडण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी सहा वाजेच्या आकडेवारीनुसार , धरणातील पाणीसाठा ८२.८६ टक्के झाला असून धरणात अजूनही २७ हजार ३८७ क्युसेकने आवक सुरूच आहे.
🗣️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आ.आंबादास दानवे यांनाही फोन.... आ. दानवेंचे शिंदेना खडेबोल
सध्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने जोरदार पक्षबांधणी मोर्चे मेळावे सुरू आहेत त्याला जनसामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असून शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदार-खासदारावर शिवसेनेचे निष्ठावंत नेतेमंडळी चांगलाच आसूड ओढत असून फुटीर आमदारांना जनताच धडा शिकवेल असे प्रतिपादन आ.अंबादास दानवे यांनी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले तसेच मलाही एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता यावर एकनाथ शिंदे यांना चांगलेच खडे बोल सुनावले चे प्रतिपादनही आ.अंबादास दानवे यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधन करताना केले
🎓 चार वर्षात मिळणार 1.4 कोटी रोजगार
सध्या क्लाऊड प्रणाली मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात असल्याने 2026 पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये 380 अब्ज डॉलरची भर पडेल, असा विश्वास नॅसकॉम या आयटी कंपन्यांच्या मध्यवर्ती संघटनेने व्यक्त केला आहे. क्लाऊडमुळे याच्याशी संबंधित असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष 1.40 कोटी रोजगारही निर्माण होतील, असा दावा नॅसकॉमने केला आहे.
📉 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण
देशांतर्गत बाजारात आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. सलग 2 महिन्यांहून अधिक काळ महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती.
✋🏻 सोनिया गांधींच्या चौकशी; राज्यभरात काँग्रेसचा निषेध मोर्चा....
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याविरोधात देशभरात काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यातही ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नेतेदेखील रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
Comments