🎯 प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी ! - एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल , याआधी 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकारने ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’ वर बंदी घातली होती
✍️ दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘सिंगल युज प्लॅस्टिक बंदी’ करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे
🤷♂️ काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
🔰 ‘सिंगल युज प्लॅस्टिक’ मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनरयांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती
🔰 मात्र बाजारात पेपरच्या नावाखाली डिश, कंटेनर, ग्लास, कप आदी प्लॅस्टिक लेप असलेल्या किंवा प्लॅस्टिक लॅमिनेशन केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात या सर्व वस्तुंमध्येही ‘प्लॅस्टिक’ आहे
🔰 हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्लॅस्टिक लेप किंवा ‘लॅमिनेशन’ केलेल्या वस्तूंवरही बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत - यासाठी शक्तिप्रदत्त’ समिती नेमण्यात आली आहे
🔰 या समितीची 7 जुलैला बैठक झाली होती , त्यामध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकॉल उत्पादने अधिसूचना-2018 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता
👉 यावस्तूंमध्ये - डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा आणि कंटेनर यांच्या उत्पादनावर आता बंदी असणार आहे
📌 एकनाथ शिंदेनी - घेतलेला हा निर्णय आपल्यासाठी , खूप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments