📣 आता बँक कर्मचाऱ्यांची करता येणार तक्रार - RBI कडून नवे नियम जारी
Banking Update
🧐 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहिती नुसार , जर बँकेकडून आपल्याला योग्य वागणूक दिली गेली नाही तर आपण बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता
✒️ यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवे नियम जारी केले आहेत - याव्यतिरिक्त ग्राहकांना काही अधिकार देखील दिले आहेत
🤷♂️ पहा कसे आहेत अधिकार
▪️ कोणत्याही बँक कर्मचाऱ्याने तुमचे काम करण्यास उशीर केला किंवा टाळण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्या बँकेच्या व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसरकडे तक्रार करू शकता.
▪️ ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी जवळपास प्रत्येक बँकेत तक्रार निवारण मंच असतो, जिथे तुम्ही तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकता.
🤔 तक्रार कुठे करायची ? - आपण ज्या बँकेचे ग्राहक असाल त्या बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन संबंधित कर्मचाऱ्याची तक्रार करू शकता.
▪️ याशिवाय बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही आपण समस्या सांगू शकता तर काही बँका ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधाही देतात
👉 बँकिंग लोकपालाकडे - बँक कर्मचार्यांची तक्रार नोंदवायची असेल, तर आपण कॉल करून किंवा ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.
▪️ ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉग इन करा - त्यानंतर File A Complaint वर जा. किंवा CRPC@rbi.org.in वर मेल पाठवून तुमची समस्या देखील नोंदवा
▪️ याव्यतिरिक्त बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 14448 हा टोल फ्री क्रमांक असून त्यावर कॉल करूनही ग्राहक तक्रारी करू शकतात - असे RBI ने म्हटले आहे
😇 आता बँक कर्मचाऱ्यांची - तक्रार करता येणार हि माहिती - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments