👌 SBI सोबत सुरु करा व्यवसाय - घरबसल्या होईल मोठी कमाई
Business Ideas Update
🧐 जर आपल्याला घरबसल्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्यासाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
💵 यामध्ये SBI ATM फ्रँचायझी घेऊन व्यवसाय सुरू करू शकता , या व्यवसायामध्ये आपल्याला दरमहा 60,000-70,000 रुपये कमवता येतील
💁♂️ एटीएम बसवणाऱ्या कंपन्या - वेगळ्या आहेत बँक कधीही आपले एटीएम स्वत: सेट करत नाही. बँकेच्या वतीने काही कंपन्यांना एटीएम बसवण्याचे काम दिले जाते, त्या वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम बसवण्याचे काम करतात.
📝 यामध्ये टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम फ्रँचायझी सेट करण्याचा करार आहे. एसबीआय एटीएमची फ्रँचायझी घेण्यासाठी आपल्याला या कंपन्यांकडे अर्ज करावा लागेल.
✒️ फ्रँचायझी घेण्यासाठी नियम -
● एटीएम सेट करण्यासाठी आपल्याकडे 50-80 चौरस फूट जागा असावी. इतर एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे. ही जागा अशा ठिकाणी असावी, जिथे लोक सहज पाहू शकतील.
● तसेच 24 तास वीजपुरवठा असावा, याशिवाय 1 किलोवॅट वीज जोडणीही आवश्यक आहे. या एटीएमची क्षमता दररोज 300 व्यवहारांची असावी. एटीएमला काँक्रीटचे छत असणे आवश्यक आहे.
● याव्यतिरिक्त V-SAT स्थापित करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
👉 अधिकृत वेबसाइट
▪️ Tata Indicash - www.indicash.co.in
▪️ Muthoot ATM - www.muthootatm.com/suggest-atm.html
▪️ India One ATM - india1atm.in/rent-your-space
💰 कशी होईल कमाई ?
● Tata Indicash ही SBI ATM ची सर्वात मोठी फ्रेंचायझिंग कंपनी आहे. ही कंपनी 2 लाखांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर एटीएम फ्रँचायझी देते.याशिवाय 3 लाख रुपये खेळते भांडवल म्हणून जमा करावे लागते
● दरम्यान SBI ATM च्या फ्रँचायझीला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नॉन-कॅश ट्रान्झॅक्शनवर 2 रुपये मिळतात
📍 नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments