💰 विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 51 हजार रुपये - राज्य सरकारची मोठी योजना
Govt. Yojna Update
🧐 राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारने स्वाधार योजना सुरु केली आहे.
🗣️ या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावी व डिप्लोमा (प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल) विद्यार्थ्यांना दरवर्षी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करत असते
💁♂️ पहा कशी आहे हि योजना - अनुसूचित जाती, नवबौद्ध समुदायातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. अकरावी, बारावी, तसेच डिप्लोमा -
💫 शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहणे, खाणे व शैक्षणिक खर्चासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी 51 हजार रुपयांची मदत केली जाते
🤔 कोणाला मिळणार लाभ ?
▪️ उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
▪️ अनुसूचित जाती, नवबौद्ध समुदायातील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
▪️ उमेदवाराचे कौटुंबिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
▪️ शैक्षणिक कालावधी दोन वर्षांहून अधिक नसावा.
▪️ दहावी किंवा बारावी परीक्षेत विद्यार्थी किमान 60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
▪️ दिव्यांग विद्यार्थ्याला या परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळालेले असावेत.
✒️ आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड, ओळखपत्र, बँकेचे खाते आणि उत्पन्नाचा दाखला
👉 असा करा अर्ज - स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतो.
आपण थोडस सहकार्य करा - ही माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments