📣 राज्य सरकारची मोठी घोषणा ! - राज्यात होणार 75 हजार पदांची भरती
Govt. Updates
🧐 राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली.
👉 येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले
🤷♂️ काय म्हणाले शंभूराज देसाई ?
▪️ कोरोना काळात आरोग्य व वैद्यकीय सेवा विभाग वगळता, अन्य विभागांमधील नोकर भरतीवर सरकारने निर्बंध घातले होते. मात्र, आता राज्यात पुन्हा एकदा नोकर भरतीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
▪️ यामध्ये लोकसेवा आयोगामार्फत 100 टक्के रिक्त पदे भरली जातील. तसेच, जिल्हा निवड समितीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50 टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत
✒️ ही माहिती आपण - सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा
Comments