😱 कर्ज महागणार ! - आरबीआयचं पतधोरण जाहीर
Breaking Update
🧐 आरबीआयच्या आज झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
✍️ तुम्हाला माहिती असेल , याआधी रेपो रेट 4.90 टक्के होता , मात्र आता त्यामध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आल्याने रेपो रेट 5.40 टक्के इतका झाला आहे - असे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले
👉 रेपो रेट वाढल्याने - गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक आणि कार कर्ज महागणार आहे.
🤔 रेपो रेट म्हणजे - ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढला की, बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते, तर रेपो रेट कमी झाला तर बँकेला स्वस्तात पैसे मिळतात.
💵 म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.
📍 रेपो दरात वाढ झाल्याने - कर्ज महागणार हि माहिती , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments