🔖 राज्य सरकारचा मोठा निर्णय - 'या' विद्यार्थ्यांची शालेय फी होणार माफ
Breaking Update
📝 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना महामारीत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
🤷♂️ काय म्हणाले शिक्षणमंत्री ?
💰 कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी / पदव्युत्तरपर्यंत पूर्ण शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
💫 यामध्ये चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ केले असून, त्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची गरज नाही - असेही ते म्हणाले
🙏 दरम्यान ही बातमी - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments