🧐 जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री बंद होणार - पहा काय आहे कारण
Govt. Update
😇 तुम्हाला माहिती असेल , जॉन्सनची बेबी पावडर , 1894 पासून विकली जात होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जॉन्स अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये वापरत असलेले टॅल्क हे जगातील सर्वात मऊ खनिजांपैकी एक आहे.
🚫 मात्र आता अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने महत्त्वाची घोषणा केली. कंपनीने म्हटले आहे की ती 2023 मध्ये जागतिक स्तरावर आधारित बेबी पावडरची विक्री बंद करणार आहे
💁♂️ पहा काय आहे कारण ?
🩺 या पावडरमध्ये एस्बेस्टोसचा एक प्रकारचा हानिकारक फायबर आढळून आला होता, जो कर्करोगाचे कारण असल्याचे मानले जात होते.
✒️ या प्रकरणी 35 हजार महिलांनी गर्भाशयाचा कर्करोग झाल्यामुळे कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यामुळे कंपनीने 2020 मध्ये यूएस आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्री बंद केली
⏲️ दरम्यान आता कंपनीने 2023 मध्ये जागतिक स्तरावर जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
📌 जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची - विक्री बंद होणार , हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments