📱 मोबाईलच्या किंमतीमध्ये होणार वाढ - प्रत्येकाने वाचा
Market Update
✒️ सर्वसामान्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण पुढील काही दिवसांत मोबाईलच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे
🚚 तुम्हाला माहिती असेल, अनेक दिग्गज कंपन्या चीनमधून स्मार्टफोनचे पार्ट्स आयात करुन भारतात ते ‘असेंबल’ करत असतात.
⛴️ स्मार्टफोन डिस्प्लेच्या आयातीवरील ‘कस्टम ड्युटी’मध्ये केंद्र सरकारने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे भारतात स्मार्टफोनच्या किंमत वाढणार आहेत
🤷♂️ किती होणार वाढ ?
💫 सध्या मोबाईल डिस्प्ले असेंब्ली युनिटच्या आयातीवर 10 टक्के सीमा शुल्क आकारले जाते, या असेंबली युनिटला स्क्रीनसोबतच स्पीकर, सिम ट्रे जोडला आहे.
✨ याशिवाय डिस्प्ले युनिटमध्ये टच पॅनल, कव्हर ग्लास, एलईडी बॅकलाईट, एफपीसी सारखे भाग समाविष्ट आहेत. मात्र, सिम ट्रे व स्पीकरसारख्या वैयक्तिक उपकरणांच्या आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
💰 मात्र आता स्पीकर, सिम ट्रे सांरख्या भागांसह येणार्या डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवर आता 15 टक्के दराने बेसिक सीमा शुल्क लागू होणार आहे.. त्यामुळे डिस्प्ले असेंबलीच्या आयातीवर कंपन्यांना आता जादा कर भरावा लागणार आहे.. त्यामुळे आगामी काळात स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहेत
📍 मोबाईलच्या किंमतीत वाढ होणार - हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments