🔖 स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - MPSC परीक्षा मध्ये होणार मोठे बदल
Govt. Updates
🧐 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गांसाठी घेण्यात येणाऱ्या भरतीप्रक्रियेमध्ये आता विविध बदल करण्यात आले आहेत.
💁♂️ पहा कसे आहेत बदल
▪️ नवीन नियमानुसार आता राजपत्रित गट अ आणि गट ब च्या सर्व पदांसाठी एकच पूर्व परीक्षा होईल. राजपत्रित गट अ आणि गट ब पदांसाठी पारंपरिक किंवा वर्णनात्मक मुख्य परीक्षा असेल.
▪️ तसेच अराजपत्रित गट ब आणि गट क पदांसाठी एकच पूर्व परीक्षा आणि त्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित गट ब आणि क साठी वेगवेगळ्या मुख्य परीक्षा होतील
▪️ याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणीत qualifying साठी 70 मार्क असतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेले हे बदल 2023 पासूनच्या परिक्षांपासून लागू होणार आहे.
▪️ त्यामुळे आता फक्त 2 पूर्व परीक्षा होतील. सर्व मुख्य परीक्षा स्वतंत्र होतील दरम्यान मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा देखील पर्याय असेल.
😇 स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी - हि माहिती खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments