Paytm कडून ग्राहकांना धक्का ! - आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागणार. Information Update
🤷♂️ Paytm कडून ग्राहकांना धक्का ! - आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागणार
Information Update
🧐 जर आपण Paytm चा वापर करत असाल, तर हि बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण Paytm ने वॉलेट बॅलन्समधून बिल पेमेंट शुल्क आता महाग केलं आहे
💰 त्यामुळे Paytm वरुन क्रेडिट कार्डचे बिल भरणाऱ्या ग्राहकांना आता वॉलेट बॅलन्समधून बिल पेमेंट करतांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे
👉 काय सांगितले कंपनीने ?
▪️ यापूर्वी Paytm वरुन क्रेडिट कार्डद्वारे बिल भरल्यास कुठल्या प्रकारचे शुल्क लागत नव्हते. मात्र आता कंपनीने या नियमांमध्ये बदल केला आहे.
▪️ जर आपले क्रेडिट कार्डचे बिल 10 हजारांपेक्षा जास्त आहे तर आपल्याला Paytm वरुन बिल भरताना 1.18% शुल्क द्यावे लागणार आहे. म्हणजे 10,118 भरावे लागणार आहे
📍 दरम्यान हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments