😱 सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी - 1 ऑक्टोंबरपासून बदलणार ‘हे’ नियम
Breaking Update
🧐 येत्या 1 ऑक्टोंबरपासून बँकेशी संबंधित व इतर अनेक नियमात बदल होणार आहे. या बदलाचा सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे
💳 १. डेबिट-क्रेडिट कार्डच्या - नियमामध्ये बदल होणार आहे, यामध्ये जेव्हा आपण कार्डने व्यवहार करतो, तेव्हा त्याचे तपशील कंपनीच्या सर्व्हरमध्ये सेव्ह व्हायचे. म्हणजे आपण एकदा कार्डची माहिती सेव्ह केल्यांनतर फक्त सीव्हीव्ही टाकून पेमेंट करता येत होते
▪️ मात्र आता यामध्ये बदल होणार आहे - त्यामुळे ग्राहकांना पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याचे नाव टोकन आहे. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल.
▪️ याची अंमलबजावणी झाल्यानंतर, ऑनलाइन पेमेंटसाठी, थेट कार्ड वापरण्याऐवजी, एक अद्वितीय टोकन वापरावे लागेल.
💰 २. अटल पेन्शन योजनेमध्ये - बदल होणार, नवीन नियमांनुसार आता आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
📈 ३. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने - 14 जून रोजी एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार, डिमॅट खातेधारकांसाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
▪️ तुम्ही टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन न केल्यास, डीमॅट खात्यात लॉग इन करू शकणार नाही. खातेधारकाला त्याच्या डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी ऑथेंटिकेशन म्हणून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल.
😇 आपण थोडस सहकार्य करा हि माहिती इतरांना देखील शेअर करा
Comments