📦 मोठी बातमी ! - आता पोस्ट ऑफिसद्वारे करता येणार ऑनलाईन शॉपिंग - प्रत्येकाने वाचा
Breaking Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, भारतात सध्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइट्सवरुन सर्वाधिक खरेदी केली जाते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय टपाल खात्यानेही आपले ‘ई-कॉमर्स पोर्टल’ सुरू केले आहे
🗣️ पोस्टाच्या या पोर्टलवर ग्राहकांना विविध वस्तू ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येतील. म्हणजे आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणे ‘इंडिया पोस्ट’ देखील ग्राहक व खरेदीदारांना त्यांच्यासोबत काम करण्याची खरेदीची संधी देणार आहे
🤔 कोणत्या वस्तू मिळणार ? - कपडे, भारतीय पोस्ट उत्पादने, बांगड्या, भेटवस्तू, घरगुती उपकरणे, आणि बास्केट इत्यादी वस्तू मिळणार आहेत
💁♂️ अशी करा खरेदी - सर्वप्रथम पोस्टाच्या Ecom.Indiapost.Gov.In च्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाइटवर जा - नंतर ‘होम पेज’ वर ‘माय अकाउंट’ या ऑप्शनवर क्लिक करा.
▪️ तेथे तुम्हाला Existing User आणि New User असे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला Register Now हा पर्याय निवडून नोंदणी करावी लागेल.
▪️ नोंदणीसाठी पत्ता, पिन कोड, राज्य, मोबाईल नंबर,व ई-मेल आयडी द्यावा लागेल - त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती सेव्ह केल्यानंतर तुम्हाला नवीन यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
त्यानंतर आपल्याला ऑनलाईन वस्तू खरेदी करता येईल - दरम्यान वेबसाईट सध्या नवीन असल्याने काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात - असे इंडिया पोस्टने सांगितले
😇 आता पोस्ट ऑफिसद्वारे - ऑनलाईन शॉपिंग करता येणार, ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments