😱 राज्यात लंपी व्हायरसचा धोका वाढला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने दिले निर्देश
Farmer Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, लंपी व्हायरस विषयी आपण याआधी सुद्धा माहिती घेतली होती - दरम्यान राज्यात जनावरांमध्ये लंपी व्हायरसचा धोका वाढत आहे.
✒️ त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे तसेच जनावरांमध्ये लंपीच्या संक्रमणाला रोखण्याचे निर्देश दिले आहेत.
💁♂️ पहा काय म्हणाले मुख्यमंत्री ?
🏥 ज्या जिल्ह्यांमध्ये या आजाराची नोंद झाली त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपापल्या भागात या आजाराबाबत जनजागृती मोहीम राबवून लोकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले.
📞 त्याचबरोबर मदतीसाठी जिल्हास्तरावर 18002330418 हा टोल फ्रीनंबर तर राज्यस्तरावर 1962 हा कॉल सेंटर टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे
🏠 दरम्यान गेल्या महिन्यात राज्यात लंपी व्हायरसने 22 जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये जळगाव, अहमदनगर, अकोला, धुळे, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद आणि कोल्हापुर जिल्ह्यातील 133 गावांमध्ये हा आजार पसरला आहे
📌 तसे या आजारावरील लक्षणे कोणती आहेत ते आपण पाहू
🐄 लक्षणे - लंपीमुळे शरीरावर मोठ-मोठ्या गाठी येतात. ताप येणे, वजन कमी होणे, लाळ वाहणे, डोळे व नाकातून पाणी येणे. पायावर तसेच कानामागे सूज येते. जनावरे दूध देण्यास कमी पडणे, आदी लक्षणे पाहायला मिळत आहे.
👉 सर्व शेतकऱ्यांसाठी - हि माहिती खुप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments