राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल. Govt. Update
🔖 राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल
Govt. Update
🧐 तुम्हाला माहिती असेल, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनावरांवर लम्पी चर्मरोगाचे संकट आले आहे - यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे
✒️ ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
🗣️ त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
🤷♂️ काय सांगितले राज्य सरकारने ?
🐂 लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकरी वा पशुपालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांनुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई दिली जाणार आहे..
🏢 तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी संबधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे.
💰 जिल्हा नियोजन समित्यांनी 2022-23 मधील उपलब्ध निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
💊 दरम्यान लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्रीवर हा निधी खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
👉 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत - पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत चर्चा करण्यात आली. राज्यस्तरीय पशूधन पर्यवेक्षकाची 286 पदे, तसेच जिल्हा परिषद स्तरावरील 873, अशी एकूण 1159 रिक्त पदे बाह्य स्रोताद्वारे भरली जाणार आहेत.
🙏 राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय - सर्व शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments