🔖 आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय - कॅन्सरच्या उपचाराची औषधे होणार स्वस्त
Govt. Update
🧐 केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सुधारित औषध यादी जाहीर केली आहे - यामध्ये कॅन्सरसह अन्य महत्वाच्या औषधांच्या किंमतीत घट केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
💊 या यादीत तब्बल ३८४ औषधांचा समावेश असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही यादी जाहीर केली आहे.
🤷♂️ काय सांगितले आरोग्य मंत्रालयाने ?
🔰 नव्या सुधारित यादी दरानुसार आता अँटिबायोटिक्स, कॅन्सर व इतर प्रतिबंधित लशी स्वस्त होणार आहे. याव्यतिरिक्त अंतःस्रावी, गर्भनिरोधक औषधी, श्वसन व नेत्रविकार संबंधित औषधी -
🔰 तसेच हृदय व रक्तनलिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक औषधी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त मुपिरोसिन, इव्हरमॅक्टिन यांसारखी संसर्गाला प्रतिरोध करणारी औषधे तसेच अन्य ३४ प्रकराची औषधे देखील स्वस्त होणार आहे.
🔰 नव्या यादीत औषधांची २७ श्रेणीमध्ये मांडणी केली गेली असून, यामधील जास्तीत जास्त औषधी ही गंभीर व अतिगंभीर आजारांवर गुणकारीरीत्या कार्य करणारी आहे.
😇 दरम्यान आरोग्य मंत्रालयाने - घेतलेला हा निर्णय आपल्यासाठी, खूप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील शेअर करा
Comments