🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - आता Whatsapp वर मिळणार अकाऊंटची सर्व माहिती
Banking Update
🧐 स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली व्हॉट्सॲप बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या पाच व्यवहारांचे मिनी स्टेटमेंट पाहता येईल
✨ या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना छोट्या कामांसाठी बँकेत जावे लागणार नाही. दरम्यान एसबीआयची व्हॉट्सॲप बँकिंग सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना प्रथम त्यांचे खाते नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.
💁♂️ अशी करा नोंदणी - SBI WhatsApp बँकिंग सेवेमध्ये बँक खाते नोंदणी करण्यासाठी WAREG A/C NO (+917208933148) वर SMS पाठवा. नोंदणी पूर्ण झाल्यावर, आपल्याला SBI ची WhatsApp बँकिंग सेवा वापरता येईल
🤔 WhatsApp बँकिंग सेवा कशा वापरायच्या - एकदा नोंदणी केल्यानंतर, +919022690226 या क्रमांकावर WhatsApp वरून HI मॅसेज पाठवा. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा.
💫 खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि व्हॉट्सॲप बँकिंगमध्ये नोंदणी करा इत्यादी
😇 प्रत्येक SBI च्या ग्राहकांसाठी - ही बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments