🧐पालकांसाठी मोठी बातमी ! - विद्यार्थ्यांचा गृहपाठ होणार बंद
Govt. Update
🖊️ विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खुप महत्वाची आहे - शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार गृहपाठ आता बंद होणार आहे - असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले
✍️ पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ घेणं हे पालकांसाठी खूप अवघड असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गृहपाठाविषयी लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
💁♂️ पहा आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री ?
● दीपक केसरकर म्हणाले कि, गृहपाठ बंद झाल्यास पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ताण हलका होऊ शकतो. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार आम्ही करत आहो
● मात्र गृहपाठाविषयी आम्ही शिक्षक संघटना, संस्था चालकांशी बोलून यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहोत,
● दरम्यान, गृहपाठ नसेल तर विद्यार्थी घरी अभ्यास करतील का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे या निर्णयावर तज्ञ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
📍 तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
😇 विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होणार - ही माहिती विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी, खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments