😱 आता व्हीआयपी नंबरसाठी द्यावे लागणार अधिक शुल्क - वाहन धारकांसाठी मोठी बातमी
Govt. Update
🧐 आता गाडीच्या व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत - कारण राज्य परिवहन विभागाने राज्यातील कार व बाईकच्या ‘व्हीआयपी’ नंबरसाठी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेला आहे
🤷♂️ पहा किती लागणार शुल्क ?
▪️मसूदा अधिसूचनेनुसार, सर्वाधिक मागणी असलेला ‘नंबर 1’ साठी चारचाकी वाहनांना याआधी 4 लाख रुपये शुल्क लागत होते - मात्र आता हा नंबर मिळवण्यासाठी 5 लाख रुपये शुल्क द्यावे लागणार आहे,
▪️तर दुचाकीसाठी 50 हजार ते 1 लाखापर्यंत पैसे मोजावे लागणार आहेत - राज्यात प्रत्येक रजिस्ट्रेशन सीरीजमध्ये 240 वेगवेगळे नंबर ‘व्हीआयपी नंबर’ म्हणून रजिस्टर्ड आहेत -
▪️यापैकी 0001, 0009, 0099, 0999, 9999 तसेच 0786 या नंबरला सर्वाधिक मागणी असते. या नंबरसाठी सध्या दीड लाख रुपये शुल्क असून, आता ते अडीच लाख रुपये होणार आहे तसेच,
▪️तीन चाकी वाहनांसाठी प्रस्तावित शुल्क 20 हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत वाढवले आहे - तर चारचाकी वाहनांसाठी प्रस्तावित शुल्क 70 हजारांहून 1 लाख रुपये करण्यात आले आहे
📌 ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments