🔖 देशात येणार नवीन टोल पाॅलिसी - अनेक वाहनावरील टॅक्स होणार कमी
Breaking Update
📝 केंद्र सरकार लवकरच नवीन टोल पॉलिसी आणण्याचा विचार करीत आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग व 'एक्सप्रेस-वे'साठी हे धोरण राबवले जाणार आहे. या धोरणानुसार, छोट्या कारमालकांना दिलासा मिळणार आहे.
🗣️ नवीन धोरण लागू झाल्यानंतर हायवेवरील टोल टॅक्सचे दर कमी होऊ शकतात - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे
🤷♂️ कोणत्या वाहनावरील टॅक्स कमी होणार
🚗 केंद्र सरकार नवीन टोल टॅक्स पॉलिसीमध्ये छोट्या वाहनांवर टोलचे दर कमी करणार असल्याचे संकेत आहेत - कारण छोट्या वाहनाचे रस्त्यावर कमी प्रेशर असतं.
🪧 राष्ट्रीय महामार्ग व 'एक्सप्रेस-वे'वर धावणाऱ्या वाहनांसाठी पॅसेंजर कार युनिटची (पीसीयू) मोजणी करण्याची विनंती केंद्र सरकारने 'आयआयटी बीएचयू'ला केली आहे. त्यामुळे वाहनाचा रस्त्यावर किती लोड पडतो, याची मोजणी केली जाणार आहे.
🚦 नवीन पॉलिसीनुसार, 'जीपीएस' आधारित टोल वसुली केली जाऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग व 'एक्सप्रेस-वे'वर वाहनाने किती प्रवास केला, त्यानुसार टोल वसूल केला जाईल. त्यासाठी 'जीपीएस' सिस्टिमचा वापर केला जाईल.
🛰️ यासाठी सॅटेलाईट्सचाही वापर केला जाऊ शकतो - असेही केंद्र सरकारने सांगितले आहे
😇 देशात नवीन टोल पाॅलिसी येणार - हि माहिती आपण इतर वाहन धारकांना शेअर करा
Comments