मोठी बातमी ! - एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी Breaking Update
😱 मोठी बातमी ! - एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी
Breaking Update
🧐 तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसंदर्भात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने घेतला आहे.
📝 राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केले होते. पण या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली होती.
🗣️ त्यावर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढची सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार - असे खंडपीठाने म्हटले आहे
💁♀️ काय आहे प्रकरण ?
▪️ नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.
▪️ त्यानुसार एक-दोन गुंठे जागेचा व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचं रेखांकन करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
▪️ त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.
🙏 आपण थोडस सहकार्य करा - हि बातमी इतरांना देखील अवश्य शेअर करा
Comments